सुखोई 30 विमान अपघात: 15 दिवसांपूर्वी लग्नाची चर्चा अन्... अपघातात महाराष्ट्राचे सुपुत्र पूर्वेश दुरुगकर शहीद
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नागपूरचा सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पुर्वेश दुरुगकर सुखोई 30 विमान अपघातात शहीद झाला. पूर्वेशने एअर फोर्स अकॅडमीतून लढाऊ वैमानिक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले होते.
advertisement
पूर्वेशच्या जाण्याने केवळ एका कुटुंबाचा आधार हिरावला नाही, तर नागपूरने आपला एक ध्येयवेडा लढाऊ वैमानिक गमावला आहे. घरात प्रेमाने 'नंदू' म्हणून ओळखला जाणारा पूर्वेश सुरुवातीपासूनच अभ्यासात आणि धाडसात पुढे होता. त्याचे वडील रवींद्र दुरुगकर (सेंट्रल रेल्वेमध्ये ट्रान्सपोर्ट इन्स्पेक्टर) आणि आई संध्या दुरुगकर यांनी आपल्या मुलाला त्याच्या स्वप्नांनुसार घडवलं.
advertisement
advertisement
डॉ. आंबेडकर कॉलेज, नागपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. एस्सी. डीग्री पूर्ण केली. त्यांनी महाराष्ट्र संचलनालयाचे प्रतिनिधित्व करत ६ राष्ट्रीय NCC शिबिरांमध्ये सहभाग घेतला होता. एरो मॉडेलिंग स्पर्धांमध्ये त्याने आपली विशेष छाप पाडली होती. AFCAT परीक्षा उत्तीर्ण करून सप्टेंबर २०२१ मध्ये हैदराबादच्या एअर फोर्स अकॅडमीत (AFA) प्रवेश घेतला आणि लढाऊ वैमानिक बनण्याचे बालपणीचे स्वप्न पूर्ण केले.
advertisement
advertisement
लढाऊ विमान उडवताना झालेल्या भीषण अपघातात पूर्वेशने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं. एकीकडे त्याच्या शौर्याचा अभिमान असला, तरी दुसरीकडे एका उमद्या तरुणाच्या अकाली जाण्याने दुरुगकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागपूरचा हा सुपुत्र आपल्या शौर्याच्या आणि स्मृतींच्या रूपाने कायम आपल्या आठवणीत राहील.








