advertisement

Gold News: आधी भरपूर सोनं खरेदी केलं, आता विकून घेणार घातक शस्त्र, इराण-इस्रायल वादात मोठी घडामोड, कोणी घेतला निर्णय?

Last Updated:

Gold Silver: गेल्या दोन वर्षांत जगातील सर्वात मोठा 'सोनं खरेदीदार' ठरलेला देश आता आपलं सोनं विकण्याच्या तयारीत आहे. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी निधी उभारण्यासाठी हा देश ऐतिहासिक पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

जगातील सर्वात मोठा सोने खरेदीदार देश, घातक शस्त्रांसाठी आता गोल्ड विकणार? जागतिक बाजार उलथापालथीचे संकेत
जगातील सर्वात मोठा सोने खरेदीदार देश, घातक शस्त्रांसाठी आता गोल्ड विकणार? जागतिक बाजार उलथापालथीचे संकेत
Gold News: जगभरातील मध्यवर्ती बँका जेव्हा सोन्याचा साठा (Gold Reserve) वाढवण्यासाठी धडपडत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक बातमी येत आहे. गेल्या दोन वर्षांत जगातील सर्वात मोठा 'सोनं खरेदीदार' ठरलेला देश आता आपलं सोनं विकण्याच्या तयारीत आहे. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी निधी उभारण्यासाठी हा देश ऐतिहासिक पाऊल उचलण्याची शक्यता आहे. असं झाल्यास सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

१३ अब्ज डॉलरचे सोने विकण्याची योजना

पोलंडच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर एडम ग्लापिंस्की आणि राष्ट्राध्यक्ष कारोल नावरॉकी यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पोलंडला आपले लष्करी सामर्थ्य दुप्पट करायचे असून, त्यासाठी सुमारे १३ अब्ज डॉलर (अंदाजे १.१ लाख कोटी रुपये) सोन्याच्या विक्रीतून उभे करण्याची त्यांची योजना आहे. याव्यतिरिक्त इतर मार्गांनी ३.२५ अब्ज डॉलर उभे करून एकूण १६ अब्ज डॉलरचे 'डिफेन्स फंड' तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
advertisement
मागील चार वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्धाचा भडका उडाला आहे. त्यातच आता इराणविरोधात अमेरिका-इस्रायलने युद्ध पुकारलं आहे. अशातच आता जग तिसऱ्या महायुद्धाकडे वळत आहे का, याची शंका निर्माण होऊ लागली आहे. या सगळ्या घङामोडीत आपल्या देशाच्या संरक्षणासाठी निधी उभारण्यासाठी पोलंड हे ऐतिहासिक पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

युरोपीय युनियनच्या कर्जाला फाटा?

पोलंड सध्या युरोपीय युनियनच्या (EU) १७४ अब्ज डॉलरच्या शस्त्र खरेदी कर्ज योजनेबाबत चिंतेत आहे. ही योजना अत्यंत महागडी असून यामुळे अमेरिकेसोबतच्या संरक्षण संबंधांवर गदा येईल, असे पोलंडचे मत आहे. म्हणूनच, बाहेरील देशांवर अवलंबून न राहता स्वतःच्या 'गोल्ड रिझर्व्ह'चा वापर करून आधुनिक शस्त्रे, रणगाडे आणि क्षेपणास्त्रे खरेदी करण्याला पोलंडने प्राधान्य दिले आहे.
advertisement

नफा कमावण्याची दुहेरी रणनीती

मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरच्या मते, सोन्याच्या सध्याच्या विक्रमी किमतींचा फायदा घेऊन काही हिस्सा विकणे फायदेशीर ठरेल. यातून मिळालेला नफा संरक्षण खर्चासाठी वापरता येईल आणि भविष्यात जेव्हा सोन्याचे भाव पुन्हा स्थिर होतील, तेव्हा हे सोने पुन्हा खरेदी करता येईल. याशिवाय, कायद्यात बदल करून सोन्याच्या साठ्याचे पुनर्मूल्यांकन (Revaluation) करण्याचा पर्यायही सरकारसमोर आहे.
advertisement

सोनं बाजारात होणार उलथापालथ?

पोलंडचा हा निर्णय जागतिक बाजारासाठी धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे. पोलंड हा सोन्याचा सर्वात मोठा पुरस्कर्ता राहिला आहे. २०२४ आणि २०२५ मध्ये पोलंडने दरवर्षी १००-१०० टन सोने आपल्या तिजोरीत जमा केले होते. आपल्या एकूण परकीय चलन साठ्यात सोन्याचा हिस्सा ३० टक्क्यांपर्यंत नेण्याची घोषणा करणाऱ्या देशाने अचानक सोने विकण्याचे संकेत दिल्याने सोन्याच्या जागतिक किमतींवर (Global Gold Prices) दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold News: आधी भरपूर सोनं खरेदी केलं, आता विकून घेणार घातक शस्त्र, इराण-इस्रायल वादात मोठी घडामोड, कोणी घेतला निर्णय?
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement