किचनचं बजेट बिघडलं! खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ, किती रुपयांनी महागलं?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये वाढ : इराण-इस्रायल युद्धामुळे गेल्या 5 दिवसांपासून जागतिक बाजार अस्थिर आहे. याचा परिणाम भारतावरही पडला आहे. यामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. जे सर्वसामान्यांसाठी मोठं टेन्शन आहे.
इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही पडत आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या तणावाचा अप्रत्यक्ष परिणाम अनेक देशांवर पाहायला मिळत आहे. या युद्धाचा परिणाम भारतावरही स्पष्टपणे दिसतोय. परिणामी दैनंदिन जीवना उपयोग होणारे खाद्य तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. ज्यामुळे लोक चिंतेत आहेत. खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे गृहिणींचं आर्थिक गणित बिघडलं आहे.
advertisement
खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये प्रति लिटर किती वृद्धी झाली आहे? सध्या खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत स्थिर असलेल्या या किंमती आठवडाभरात 4-5 रुपये प्रति लिटरने वाढल्या आहेत.व्यापारी सूत्रांचे म्हणणे आहे की, बाजारातील परिस्थिती अशीच राहिली तर येत्या आठवड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. न्यूज18 कन्नडच्या वृत्तानुसार, प्रति लिटर 10 ते 15 रुपयांची वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. ही वाढ केवळ स्थानिक बाजारपेठेमुळे नाही तर ती आंतरराष्ट्रीय पुरवठा व्यवस्थेतील बदलांमुळे आहे.
advertisement
स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती का वाढत आहेत? मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे किमती वाढत आहेत. या युद्धाचा विशेषतः समुद्री मार्गांवर परिणाम होत आहे. भारतातील बहुतेक स्वयंपाकाचे तेल परदेशातून आयात केले जाते. आपण सूर्यफूल तेल आणि पाम तेल यांसारखी तेले आयात करतो, विशेषतः युक्रेन, रशिया, इंडोनेशिया, मलेशिया आणि मध्य पूर्वेकडून.युद्धामुळे, संबंधित देशांमधील बंदर वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक विशेषतः प्रभावित झाली आहे. हा मार्ग जगाच्या तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी या महत्त्वाच्या मार्गावरील वाढत्या तणावामुळे शिपिंगला विलंब होत आहे. काही जहाजे इराणी प्रदेशात अडकून पडली आहेत. या परिस्थितीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. जहाजांना केप ऑफ गुड होपसारखे पर्यायी मार्ग वापरावे लागले आहेत. हा मार्ग खूप लांब आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत आहे. इंधन आणि वाहतूक खर्च देखील वाढत आहेत. या अतिरिक्त खर्चामुळे आयात किमती वाढल्या आहेत.
advertisement
बाजारातील किंमतीची ताजी परिस्थिती अशी आहे की, गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात खाद्यतेलाच्या किमंतींमध्ये स्पष्ट वाढ झाली आहे. लोकप्रिय ब्रँडच्या किंमतीत बदल झाले आहेत. गोल्ड वनर : गेल्या आठवड्यात एक लिटर तेलाच्या किंमती 161 रुपये होती. ज्या या आठवड्यात वाढून 165 रुपये झाली आहे.सन प्योर : गेल्या आठवड्यात 161 रुपयांच्या किंमती आता वाढून 165 रुपये झाल्या आहेत. फॉर्च्यून : गेल्या आठवड्यात 152 रुपये किंमती होत्या. ज्या या आठवड्यात 157 नोंदवण्यात आल्या आहेत. एवढंच नाही तर सफोला आणि सनड्रॉप सारख्या इतर लोकप्रिय ब्रँडच्या किमंतीही सरासरी 4 ते 5 रुपयांनी वाढल्या आहेत. हा फक्त एक आठवड्याचा बदल आहे. व्यापारी इशारा देत आहेत की, युद्धाची परिस्थिती दीर्घकाळ जारी राहिली तर ही वृद्धी आणखी वेगाने वाढू शकते.
advertisement
कौटुंबिक बजेटवर परिणाम... भारतातील प्रत्येक कुटुंबासाठी स्वयंपाकाचे तेल ही दैनंदिन गरज आहे. या आवश्यक वस्तूची वाढती किंमत मध्यमवर्गीय कुटुंबांवर ओझे बनत आहे. न्यूज18 कन्नडच्या मते, ही वाढ घरगुती खर्चाचे संतुलन साधण्याच्या आधीच कठीण परिस्थितीत आणखी ताण निर्माण करत आहे. या वाढीमुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि अन्न व्यवसायांनाही अडचणी येत आहेत. स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने अन्न तयार करण्याचा खर्चही वाढत आहे. याचा परिणाम भविष्यात अन्नाच्या किमतींवर होऊ शकतो.
advertisement
भविष्यात आणखी वाढ होणार? मध्य पूर्वमध्ये जारी तणाव दीर्घकाळ कायम राहिला तर आंतरराष्ट्रीय बाजारात याचा आणखी प्रभाव पडू शकतो. जगातील सुमारे 20 टक्के तेल पुरवठा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो. हा मार्ग विस्कळीत झाला तर सर्व आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होईल. भारतासारख्या आयात-अवलंबित देशांना सर्वाधिक नुकसान होईल.
advertisement
फक्त खाद्यतेलाच्या किंमती वाढणार नाही. इंधनाच्या किंमती, वाहतूक खर्च आणि खाद्य पदार्थांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. एकूणच मध्य पूर्वमध्ये सुरु असलेल्या युद्धासारख्या स्थितीमध्ये हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्या भारतीय कुटुंबाच्या स्वयंपाक घरावरही परिणाम होत आहे. या घटनेवरून जागतिक राजकीय घटना सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करतात हे स्पष्टपणे दिसून येते.









