Solapur Crime: लग्न होईना; मुलाचं डोकं फिरलं, लोखंडी पाईप घेतला अन् वडिलांनाच संपवलं, सोलापूर हादरलं!
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur News: अतुलच्या लग्नाच्या विषयावरूनही घरात वारंवार वाद होत होते. याच कारणावरून पिता-पुत्रामध्ये काही दिवसांपासून तणावाचे वातावरण होते.
सोलापूर: लग्नाचा प्रश्न आणि बँकेचे कर्ज फेडण्यासाठी शेती विकण्याच्या कारणावरून पोटच्या मुलानेच जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून केला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रमेश बट्टू कुंभार असे 55 वर्षीय असे मृत पित्याचे नाव असून, मुलगा अतुल रमेश कुंभार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगोला तालुक्यातील वाकी-शिवणे पाटील मळा येथे सोमवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मृताची पत्नी समाबाई रमेश कुंभार यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश कुंभार यांच्याकडे चार एकर शेती होती. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी ती शेती विकण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मुलगा अतुलच्या लग्नाच्या विषयावरूनही घरात वारंवार वाद होत होते. याच कारणावरून पिता-पुत्रामध्ये काही दिवसांपासून तणावाचे वातावरण होते.
advertisement
सोमवारी रात्री रमेश कुंभार हे शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी संतापाच्या भरात अतुल कुंभार तेथे पोहोचला. त्याने लोखंडी पाइपने रमेश कुंभार यांच्या डोक्यावर, तोंडावर आणि पायावर जोरदार प्रहार केले. या मारहाणीत रमेश कुंभार गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर अतुल कुंभार घरी येत आईसमोर रडू लागला. “वडिलांनी खूप कर्ज केले आहे, शेती विकायला काढली आहे आणि माझे लग्न करत नाहीत,” या रागातून आपण वडिलांचा खून केल्याचे त्याने आईला सांगितल्याची माहिती समोर आली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून, सांगोला पोलिसांनी आरोपी अतुल कुंभार याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 1:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Crime: लग्न होईना; मुलाचं डोकं फिरलं, लोखंडी पाईप घेतला अन् वडिलांनाच संपवलं, सोलापूर हादरलं!









