मी आनंदी नव्हतो, प्रेम हवं! लग्नाच्या 13 वर्षांनंतर सैफने करीनाशी नात्याबाबतची सगळी सीक्रेट उलगडली
- Published by:Priya Lad
Last Updated:
Saif Ali Khan Kareena Kapoor : सैफ अली खान आणि करीना कपूर बॉलिवूडमधील फेमस कपल्सपैकी एक. सैफने पहिल्यांदाच त्यांच्या नात्यातील सीक्रेट सगळ्यांसमोर उलगडलं आहे.
सैफ अली खान आणि करीना कपूर हे बी-टाउनमधील आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. 16 ऑक्टोबर 2012 रोजी त्यांचं लग्न झालं. त्यांना आता तैमूर आणि जहांगीर किंवा जेह अशी दोन मुलं आहेत. त्यांच्या लग्नाला आता 13 वर्षे उलटून गेली आहेत. करीनाशी लग्नानंतर इतक्या वर्षांनी सैफ अली खान रिलेशनशिपबाबत आपलं मन मोकळं केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
सैफने कबूल केलं की कधीकधी तो थोडा भावनिकदृष्ट्या संवेदनशील असू शकतो. पण त्यांच्यातील प्रेम आणि समजुतीमुळे त्यांचं नातं फुलतं. तो म्हणाला, "अनेकदा वैयक्तिक असुरक्षितता बालपणीच्या अनुभवांमधून येते. नातेसंबंधात कधीकधी तुमचा पार्टनर या समस्यांना तोंड देण्यास मदत करतो. नात्यात स्वातंत्र्य महत्त्वाचं असलं तरी प्रेम आणि काळजी हेही तितकंच महत्त्वाचं आहे. लग्न हे फक्त दोन लोक एकत्र राहणं नसावं, तर त्यांच्यात जवळीक एक खास बंधनही असायला हवं"
advertisement
सैफने मुलं झाल्यानंतर नातेसंबंधांमध्ये होणाऱ्या बदलांबद्दलही सांगितलं. तो म्हणाला, "मुलं झाल्यानंतर अनेक जोडप्यांचं नातं बदलतं आणि कधीकधी ते कठीणही बनतं. अशावेळी लग्न यशस्वी करण्यासाठी अनेकदा नशीब लागतं. दोन्ही लोकांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे समान गोष्टी असाव्यात यासाठी तुम्ही भाग्यवान असलं पाहिजे. त्याच्यात आणि करीनामध्ये चांगला समतोल असल्याचं त्याने सांगितलं. त्या दोघांचं स्वत:चं काम आणि स्वत:ची स्पेस आहे. पण काही गोष्टी त्यांना एकत्र आणतात. ते एकत्र वेळ घालवतात आणि अनुभव शेअर करतात"
advertisement
advertisement










