कर्जत ते पनवेल सुसाट, पण प्रवासी संकटात, 'त्या' स्थानकामुळे वाढलं टेन्शन
Last Updated:
Panvel Karjat Rail Project : पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे एक नवीन समस्या निर्माण झालेली आहे. ज्यात कोणत्या प्रवाशांना कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे ते जाणून घेऊयात.
मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्याचा आता विस्तार होत असून त्यामध्ये आता पाचव्या कॉरिडॉरची भर पडणार आहे. मध्य रेल्वेचा अत्यंत महत्त्वाचा पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने होत आहे मात्र या कामामुळे कर्जत स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नेमकं काय घडतंय कर्जत स्थानकावर?
गेल्या काही महिन्यांपासून पनवेल-कर्जत दुहेरी मार्गिकेचे काम सुरु आहे,त्यामुळे कर्जत स्थानकावरही त्याचे काही काम सुरु आहे. मात्र ज्यामुळे सध्याचे कर्जत स्थानक आणि नवे कर्जत स्थानकातील अंतर अतिशय लांब होत आहे. त्यामुळे या दोन स्थानकातील अंतर कमी कमी अर्ध्या तासांचे आहे. जर प्रवाशांना सामान घेऊन जर रिक्षाने जायचे असल्यास अतिरिक्त पैसेही द्यावे लागत आहे शिवाय पायपीटही होत आहे, त्यामुळे या सर्व समस्येवर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
मध्य रेल्वेच्या पनवेल-कर्जत दुहेरी प्रकल्पाच्या कामाला 2018 मध्ये मंजूरी मिळाली होती मात्र अनेक महत्त्वाच्या बाबी पूर्ण करु या प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. सध्या 86 टक्के काम पूर्ण झालं आहे तर राहिलेले काम पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.
या रेल्वे प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये
नवा पनवेल-कर्जत हा दुहेरी रेल्वे मार्ग तब्बल 29.6 किमी लांबीचा असून त्यात पनवेल, चिखले, पोयंजे, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके आहे आणि यात कर्जत स्थानक हे जुन्या कर्जत स्थानकापासून खूप लांब आहे.
advertisement
जुन्या-नव्या कर्जत स्थानकातील अंतर किती आहे?
सध्याच्या स्थितीला या दोन कर्जत स्थानकातील पायी अंतर हे 1.5 किती आहे तर हे पार करण्यासाठी साधारण 21 मिनिटे लागतात आणि त्यातही तुमच्याकडे दुचाकी किंवा चारचाकी असेल तर हे अंतर 2.2 ते 2.4 किमी असून ते पूर्ण करण्यासाठी 7 ते 8 लागतात. विशेष म्हणजे एमआरव्हीसीव्दारे रेल्वे मार्गालगत 500 मीटर लांबीची पायवाटही करण्यात येणार आहे मात्र जर जे प्रवासी सामान घेऊन प्रवास करणार त्यांचे हाल होणार त्यामुळे या ठिकाणी सरकता पदपथ बसवावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 12:17 PM IST









