'लव्ह जिहाद'चा बळी ठरली मोनालिसा! फरमानशी लग्न नाही सौदा, दिग्दर्शकाचा खळबळजनक दावा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kumbhmela Girl Monalisa Marriage : कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाला सिनेक्षेत्रात आणणाऱ्या दिग्दर्शकाने तिच्या फरमान खानशी लग्नाबाबत खळबळजनक दावा केला आहे.
advertisement
मोनालिसाचं लग्न म्हणजे प्रेम नाही तर हा सौदा आहे, असा खळबळजनक दावा तिला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाने केला आहे. मोनालिसाला सिनेसृष्टीत आणणारा दिग्दर्शक सनोज मिश्रा. ज्याने मोनालिसाची फिल्म द डायरी ऑफ मणिपूर दिग्दर्शित केली आहे. त्याने मोनालिसासोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि मोनालिसाच्या लग्नाचं भयानक सत्य सांगितलं आहे.
advertisement
advertisement
सनोज मिश्रा पोस्टमध्ये म्हणाला, "मोनालिसा पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आहे पण मी निराश आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आहे. एक गरीब, जंगलात राहणारी मुलगी कुंभमेळ्यातील तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती महेश्वरला पळून गेली. तिचं गंगासारखं पावित्र्य पाहून मी तिला प्रशिक्षण दिलं आणि ती माझ्या चित्रपटात अभिनेत्री असेल अशी घोषणा केली आणि जगाने तिचं स्वागत केलं. पण आमच्या विरोधकांपैकी एक असलेल्या वसीम रिझवीला हे आवडलं नाही आणि त्याने मला खोट्या आरोपाखाली तुरुंगात पाठवलं"
advertisement
"मी तुरुंगात असतानाही फिल्मची स्टोरी लिहिली. मनोज आता कधीच फिल्म बनवणार नाही असं ज्यांना वाटत होतं, त्यांना आता कोणता आरोप किंवा पुढे काय करावं हे समजत नव्हतं. त्यांच्याकडे एकच पर्याय होता मोनालिसा, जिला मी गंगामातेचा अवतार मानत होतो. मोनालिसाचं आयुष्य सोपं नाही. तिची आई, मोठी आई, धाकटी आई, वडील, मोठे वडील, धाकटे वडील, सर्वच ढोंगी होते. तिचं आयुष्य तिच्या खऱ्या आईवर अवलंबून होते, जिला तिच्या वडिलांनी हाकलून दिलं आणि दुसरं लग्न केलं", असं सनोजने सांगितलं.
advertisement
सनोज पुढे म्हणाला, "बंजारा लोकांचे कायदे खूप वेगळे असल्याने मोनालिसाला तिच्या नवीन आईने सांगितलेल्या गोष्टी स्वीकाराव्या लागत होत्या. पण जेव्हा मोनालिसा सेलिब्रिटी झाली आणि तिच्या खऱ्या आईला भिकाऱ्यासारखं माळा विकताना पाहिलं तेव्हा ती रडायची. तिने अनेक वेळा तिचं दुःख माझ्याकडे व्यक्त केलं आणि बंड करण्याची इच्छाही व्यक्त केली. ती म्हणायची की जर तिला कधी संधी मिळाली तर ती सर्वांना लाथ मारून तिच्या आईकडे जाईल. मी तिला नेहमीच हे समजावून सांगितलं. पण वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणं योग्य नव्हतं"
advertisement
"मोनालिसाला वाटत असेल की तिचं कृत्य तिच्या कुटुंबाविरुद्ध बंड आहे. पण हे पाऊल बंड नाही तर लव्ह जिहाद आहे, ज्याची ती बळी ठरली आहे. यामध्ये तोतया शिक्षकाचा समावेश आहे, ज्याला मी त्याला पैसे देऊन मोनालिसाचा मॅनेजर बनवलं. मी त्याला मोनालिसाला प्रशिक्षण देण्यासाठी निवडलं होतं, पण तो दलाल बनला आणि दक्षिण भारतात मोनालिसाचा व्यापार करू लागला. नंतर त्याने हळूहळू मला बंजारा समुदायापासून दूर केलं ज्याचे परिणाम आज स्पष्ट दिसत आहेत", असं सनोज म्हणाला.









