Shani Asta 2026: वाटतंय तितकं सोपं नाही! शनी-मंगळ-बुधाचा अस्त म्हणजे या 3 राशींवर खराब वेळ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार सध्या मोठे ग्रह अस्तावस्थेत जात आहेत. 13 मार्च रोजी शनि मीन राशीत अस्त होणार आहे. ग्रहांच्या स्थितीवर नजर टाकली तर मंगळ आणि बुध आधीच अस्त स्थितीत आहेत. अशा प्रकारे तीन मोठ्या ग्रहांचा एकाच वेळी अस्त होणे तीन राशींसाठी नुकसानदायक ठरू शकते.
advertisement
कर्क - तीन मोठ्या ग्रहांचा अस्त होणे कर्क राशीसाठी चिंतेचा विषय आहे. कामाच्या ठिकाणी काही अडचणी वाढू शकतात आणि कौटुंबिक जीवनही तणावपूर्ण राहील. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करणे गरजेचे आहे, कारण एक छोटीशी चूकही तुमचे मोठे नुकसान करू शकते. या काळात राग आणि अहंकार टाळा. लोकांशी बोलताना शब्द जपून वापरा, जेणेकरून विनाकारण वाद होणार नाहीत.
advertisement
advertisement
advertisement
मकर - मकर राशीसाठी हा काळ थोडा कठीण असू शकतो. पैशांचा ओघ मंदावेल, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक दबावाखाली असल्याचे जाणवेल. अशा परिस्थितीत मोठे किंवा जोखमीचे आर्थिक निर्णय घेणे टाळलेलेच बरे. शारीरिक इजा किंवा अपघाताची शक्यता दिसत असल्याने आरोग्याकडे आणि प्रवासात विशेष लक्ष द्या. जोडीदारासोबत वाद वाढू शकतो, त्यामुळे वैवाहिक आयुष्यात ताळमेळ राखण्यासाठी तुम्हाला जास्तीचे प्रयत्न करावे लागतील.
advertisement
अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी उपाय - या ग्रहांचा अस्त तुमच्यासाठी त्रासदायक ठरत असेल, तर खालील उपाय करणे फायदेशीर ठरेल. शनिवारी काळे तीळ, काळे कपडे किंवा मोहरीच्या तेलाचे दान करा. बुधवारी गणपतीची पूजा करून हिरव्या मुगाचे दान करा. मंगळवारी हनुमान चालीसा वाचा, ज्योतिष तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तांब्याचे कडे किंवा अंगठी धारण करणे फायदेशीर ठरू शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)






