डेबिट की क्रेडिट कार्ड कोण सर्वात जास्त खतरनाक? बऱ्याच लोकांना माहिती नाही हे सीक्रेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डेबिट कार्डचा धोका म्हणजे बँक खात्याशी डायरेक्ट अॅक्सेस, तर क्रेडिट कार्ड फ्रॉडमध्ये बँकेचा पैसा असतो. ऑनलाईन शॉपिंगसाठी क्रेडिट कार्ड सुरक्षित, पण आर्थिक शिस्त आवश्यक.
डेबिट कार्डचा सर्वात मोठा धोका म्हणजे त्याचा तुमच्या बँक खात्याशी असलेला 'डायरेक्ट अ‍ॅक्सेस'. विचार करा, एका चुकीच्या लिंकवर क्लिक झालं आणि तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे काही सेकंदात उडाले तर? डेबिट कार्ड फ्रॉड म्हणजे थेट तुमच्या हक्काच्या कमाईवर डल्ला! एकदा का खातं रिकामं झालं की, बँकेचे हेलपाटे आणि पोलिसांच्या चकरा मारूनही पैसे परत मिळतीलच याची खात्री नसते.
advertisement
दुसरीकडे, क्रेडिट कार्ड हे तुमच्यासाठी एका 'बॉडीगार्ड'सारखं काम करतं. क्रेडिट कार्डवरून फ्रॉड झाला, तर तो पैसा तुमचा नसतो, तो बँकेचा असतो! अशा वेळी तुम्ही ताठ मानेने बँकेला सांगू शकता, हा व्यवहार मी केला नाहीये. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुमच्या हक्काच्या बँक बॅलन्सला कोणी हातही लावू शकत नाही. म्हणूनच सायबर तज्ज्ञ म्हणतात, ऑनलाईन शॉपिंगसाठी क्रेडिट कार्ड हे सर्वात सुरक्षित 'शस्त्र' आहे.
advertisement
पण सावध राहा! क्रेडिट कार्ड जेवढं सुरक्षित आहे, तेवढंच ते 'मिठाचं गाठोडं' देखील आहे. "आज शॉपिंग करा आणि ४५ दिवसांनी पैसे भरा" ही सुविधा वाचायला छान वाटते, पण यातच 'आर्थिक शिस्तीचा' कस लागतो. जर तुम्हाला स्वतःच्या खर्चावर ताबा मिळवता येत नसेल, तर हेच कार्ड तुम्हाला कर्जाच्या अशा खाईत लोटेल जिथून बाहेर पडणं अशक्य होईल.
advertisement
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे 'मिनिमम ड्यू' भरणं. जर तुम्ही पूर्ण बिल न भरता फक्त ५ टक्के रक्कम भरली, तर उरलेल्या रकमेवर ३६% ते ४२% पर्यंत अवाढव्य व्याज लागतं. हे व्याज म्हणजे एखाद्या चक्रव्यूहासारखं आहे. बघता बघता तुमची छोटीशी उधारी लाखांच्या घरात पोहोचते आणि तुम्ही बँकांच्या 'रिकव्हरी एजंट्स'च्या कचाट्यात सापडता.
advertisement
दोन्ही कार्ड्स वापरण्याचे काही अलिखित नियम आहेत. ऑनलाईन शॉपिंग, हॉटेल बिलं किंवा पेट्रोल पंपावर व्यवहार करताना डोळे झाकून 'क्रेडिट कार्ड' वापरा. पण जर एटीएममधून कॅश काढायची असेल, तर मात्र 'डेबिट कार्ड'च बेस्ट! कारण क्रेडिट कार्डने एटीएममधून पैसे काढणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे, त्यावर खूप जास्त चार्जेस लागतात.
advertisement
लक्षात ठेवा, कोणतंही कार्ड स्वतःहून 'डेंजरस' नसतं; आपला निष्काळजीपणा त्याला तसं बनवतो. डेबिट कार्डमध्ये 'तात्काळ कंगाल' होण्याचा धोका आहे, तर क्रेडिट कार्डमध्ये 'भिकेला लागण्याचं' टेन्शन! जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या हुशार असाल, तर क्रेडिट कार्ड हे तुमच्यासाठी एक वरदान ठरेल. त्यामुळे कार्ड स्वॅप करण्यापूर्वी एकदा विचार नक्की करा, कारण हा खेळ तुमच्या कष्टाच्या पैशाचा आहे!
advertisement









