Farooq Abdullah : पळत आला, डोक्यावर बंदूक ताणली अन् सेकंदाच्या फरकाने वाचले फारूक अब्दुल्लाह, CCTV व्हिडीओ समोर!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Farooq Abdullah Attack CCTV Video : फारुख अब्दुल्ला यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यात हल्लेखोर कमल सिंग जामवाल मागून येत फारुखच्या डोक्यावर बंदूक रोखताना दिसत आहे.
Farooq Abdullah Attack CCTV Video : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री एका व्यक्तीने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे त्यांना काहीही इजा झाली नाही. फारुख जम्मूमध्ये एका लग्नासाठी आले असताना त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील होते, ते या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले आहेत. अशातच आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय.
सीसीटीव्ही फुटेजही समोर
फारुख अब्दुल्ला यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यात हल्लेखोर कमल सिंग जामवाल मागून येत फारुखच्या डोक्यावर बंदूक रोखताना दिसत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब हल्लेखोराचा हात काढून टाकला, ज्यामुळे बंदूक हवेत गोळीबार करू लागली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी फारुख यांना सुरक्षित स्थळी नेलं अन् हल्लेखोराला अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेवर जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलीये.
advertisement
बड़ी खबर-
जम्मू में पूर्व मुखमंत्री फारूक अब्दुल्लाह पर एक शादी समारोह में फायरिंग । गोली चली। बाल बाल बचे। डिप्टी सीएम सुरेंद्र चौधरी भी साथ थे।
हमलावर कमल सिंह जामवाल गिरफ्तार! pic.twitter.com/1qkBWGwjho
— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) March 11, 2026
advertisement
लोड केलेल्या पिस्तूलमधून गोळी झाडली
अल्लाहची मेहेरबानी आहे. माझ्या वडिलांवरचा जीवघेणा प्रसंग थोडक्यात टळला. सध्या या घटनेचे सविस्तर तपशील समोर आलेले नाहीत, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, एका बंदूकधारी व्यक्तीने अत्यंत जवळून लोड केलेल्या पिस्तूलमधून गोळी झाडली. केवळ क्लोज प्रोटेक्शन टीमने ती गोळी वळवली आणि हत्येचा हा प्रयत्न हाणून पाडला, असं उमर अब्दुल्ला म्हणाले.
advertisement
Allah is kind. My father had a very close shave. The details are sketchy at the moment but what is known is that a man with a loaded pistol was able to get within point blank range & discharge a shot. It was only the close protection team that deflected the shot & ensured that… https://t.co/hYBe64Eigl
— Omar Abdullah (@OmarAbdullah) March 11, 2026
advertisement
झेड प्लस आणि एनएसजी सुरक्षा असताना...
दरम्यान, हल्ला झाल्यानंतर आता या क्षणी उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त आहेत; विशेषतः झेड प्लस आणि एनएसजी सुरक्षा कवच लाभलेल्या एका माजी मुख्यमंत्र्यांच्या इतक्या जवळ एखादी व्यक्ती पोहोचूच कशी शकते, हा मोठा प्रश्न आहे, असं सवाल उमर अब्दुल्ला यांनी विचारला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 7:54 AM IST
मराठी बातम्या/देश/
Farooq Abdullah : पळत आला, डोक्यावर बंदूक ताणली अन् सेकंदाच्या फरकाने वाचले फारूक अब्दुल्लाह, CCTV व्हिडीओ समोर!










