advertisement

Thane News: दोन सख्ख्या तरुण बहिणी घरातून गायब, 'त्याच्या'वर संशय, पण तपासातून पुढं आलं धक्कादायक कारण

Last Updated:

Thane News: पोलिसांनी मुलींशी संबंधित मोबाईल क्रमांक तपासला. त्या क्रमांकाच्या तांत्रिक माहितीच्या आधारे लोकेशन मिळाली

Thane News: दोन सख्ख्या तरुण बहिणी घरातून गायब, 'त्याच्या'वर संशय, पण तपासातून पुढं आलं धक्कादायक कारण
Thane News: दोन सख्ख्या तरुण बहिणी घरातून गायब, 'त्याच्या'वर संशय, पण तपासातून पुढं आलं धक्कादायक कारण
ठाणे : कल्याण पूर्वेतील घरातून दोन सख्ख्या तरुण बहिणी गायब झाल्या होत्या. या घटनेत एका तरुणावर पोलिसांना संशय आला. त्याच्या घरात मोबाईल क्रमांक आढळला. त्यानंतर पोलीस तपास करत गेले आणि धक्कादायक कारण बाहेर आले. शेवटी तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा अंबरनाथ येथील मित्राच्या घरी त्या सुखरूप होत्या.
नेमकं काय घडलं ?
कल्याणमधील या कुटुंबात राहणाऱ्या दोन बहिणी घरातून अचानक गायब झाल्या होत्या. तपास अधिक सखोल केला असता समोर आले की, सावत्र आई आणि सख्खा वडील दोघांकडून मुलींवर मारहाण केली जात होती आणि त्यांना शिक्षण घेऊ दिलं जात नव्हतं. मुलींना शिक्षण पूर्ण करून पुढे स्वतः काहीतरी करायचं होतं, पण घरात परिस्थिती अशी होती की राहणं सुरक्षित नव्हतं. त्याच कारणामुळे त्या घर सोडून गेल्या होत्या.
advertisement
मुलींचा शोध मोबाईलमुळे लागला
पोलिसांनी मुलींशी संबंधित मोबाईल क्रमांक तपासला. त्या क्रमांकाच्या तांत्रिक माहितीच्या आधारे लोकेशन मिळाली आणि लक्षात आले की बहिणी अंबरनाथजवळील एका मित्राच्या घरी सुरक्षित होत्या. पोलिसांनी त्या तिथे जाऊन दोन्ही बहिणींना सुरक्षितरीत्या शोधले आणि विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात आणले. मुलींनी सांगितले की, त्या आता घरात राहू इच्छित नाहीत आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहून शिक्षण सुरू ठेवायचं आहे. त्यांनी आपले भविष्य स्वतः घ्यायचं ठरवले आहे. असं या तपासात पोलिसांना त्यांनी सांगितलं.
advertisement
यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास पूर्ण केल्यानंतर बहिणींना त्यांच्या इच्छेनुसार सोडले. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कोळी यांनी सांगितले की, दोन्ही बहिणी सुरक्षित होत्या आणि त्यांना कुठलाही धोका नव्हता. पोलिसांनीही स्पष्ट केले की, या प्रकरणातून मुलींच्या सुरक्षिततेसाठी तांत्रिक तपास किती महत्त्वाचा ठरतो हे लक्षात आले.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News: दोन सख्ख्या तरुण बहिणी घरातून गायब, 'त्याच्या'वर संशय, पण तपासातून पुढं आलं धक्कादायक कारण
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement