advertisement

लोणावळ्यात खळबळ! सतत ठेवायचा तिच्यावर नजर अन् मग पाठलाग करत...; युवकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं आयुष्यच संपवलं

Last Updated:

एका युवकाच्या सततच्या त्रासाला आणि बदनामीला कंटाळून या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी तिघा जणांविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

अल्पवयीन मुलीनं आयुष्यच संपवलं (प्रतिकात्मक फोटो)
अल्पवयीन मुलीनं आयुष्यच संपवलं (प्रतिकात्मक फोटो)
लोणावळा : लोणावळ्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यात लोणावळ्यातील ग्रामीण भागातील कुसगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली. एका युवकाच्या सततच्या त्रासाला आणि बदनामीला कंटाळून या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी तिघा जणांविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बदनामी आणि मानसिक छळ
मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यश ऊर्फ गजानन जगदीश राऊत हा युवक सातत्याने मुलीची बदनामी करत होता. ती कोणाशी बोलते, कुठे जाते यावर तो नजर ठेवून होता आणि तिचे नाव इतर मुलांशी जोडून तिला समाजात बदनाम करण्याचा प्रयत्न करत होता. ८ मार्च रोजी आरोपींनी मुलीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली होती. या सततच्या मानसिक छळामुळे आणि झालेल्या अपमानामुळे मुलगी प्रचंड तणावात होती. अखेर, सोमवारी (दि. १०) तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
advertisement
या घटनेने लोणावळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी यश राऊतसह शुभम ऊर्फ सोन्या जगदीश राऊत आणि जगदीश महादेव राऊत (सर्व रा. कुसगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलगी असल्याने या प्रकरणात 'पॉक्सो' (POCSO) कायद्याचा कडक कलम लावण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या या नराधमांना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. मात्र, एका अल्पवयीन मुलीनं अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्यानं परिसरात हळहळही व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
लोणावळ्यात खळबळ! सतत ठेवायचा तिच्यावर नजर अन् मग पाठलाग करत...; युवकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं आयुष्यच संपवलं
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement