Team India : वर्ल्ड कप जिंकला, पण किंमत मोजावी लागली... टीम इंडियाच्या खेळाडूला फायनलनंतर धक्का!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडिया पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन झाली आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 रननी पराभव केला.
मुंबई : टीम इंडिया पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन झाली आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 रननी पराभव केला, याचसोबत भारताने लागोपाठ दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला, पण हा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही भारतीय खेळाडूला मोठी किंमत मोजावी लागली आहे. वर्ल्ड कप जिंकल्याच्या तीन दिवसांमध्येच टीम इंडियाच्या खेळाडूला धक्का लागला आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला आयसीसी रँकिंगमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरुण आता नंबर वन बॉलर राहिलेला नाही. अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर रशीद खान त्याच्या जागी नंबर वन टी-20 बॉलर झाला आहे. रशीद खान 753 रेटिंग पॉईंट्ससह आयसीसी टी-20 क्रमवारीमध्ये नंबर वन झाला आहे. वरुण चक्रवर्ती आता 740 रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. बॉलरच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराहने मोठी उडी घेतली आहे. बुमराह आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. बॅटिंगच्या क्रमवारीत अभिषेक शर्मा नंबर वन बॅटर म्हणून कायम आहे, पण इशान किशन त्याच्यासाठी मोठा धोका आहे.
advertisement
अभिषेक शर्मा 875 रेटिंग पॉईंट्ससह अव्वल स्थानावर आहे, तर इशान किशन त्याच्यापेक्षा फक्त चार पॉईंट्सनी मागे आहे. 871 पॉईंट्ससह इशान किशन दुसऱ्या स्थानावर आहे. इशानने पाकिस्तानी बॅटर साहिबजादा फरहान आणि इंग्लडचा खेळाडू फिल सॉल्टला मागे टाकले आहे. भारताचे एकूण चार बॅटर टॉप 10 मध्ये आहेत. अभिषेक आणि इशान व्यतिरिक्त, सूर्यकुमार यादव 9व्या आणि तिलक वर्मा 7 व्या स्थानावर आहे.
advertisement
संजू सॅमसनची मोठी उडी
संजू सॅमसनने आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टी-20 रेटिंग मिळवली आहे. संजू 637 रेटिंग पॉईंट्ससह 22 व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो 65 व्या स्थानावर होता, पण लागोपाठ 3 अर्धशतकं करून संजूने 43 बॅटरना मागे टाकत 22वा क्रमांक गाठला आहे. संजू सॅमसन हा टी-20 वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता. संजूने 5 सामन्यांमध्ये 80.25 च्या सरासरीने 321 रन केल्या. सॅमसनने टी-20 वर्ल्ड कपमध्ये 24 सिक्स आणि 27 फोर मारले, वर्ल्ड कपमधला त्याचा स्ट्राईक रेटही 200 च्या जवळ होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 11:59 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : वर्ल्ड कप जिंकला, पण किंमत मोजावी लागली... टीम इंडियाच्या खेळाडूला फायनलनंतर धक्का!









