'द हंड्रेड'मध्ये स्मृती मानधनाची एन्ट्री, 50 हजार पाऊंडची बोली, टीम इंडियाच्या पोरीही मालामाल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
2025 च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला खेळाडूंची जगभरात डिमांड वाढत आहे, इंग्लंडमधली द हंड्रेड स्पर्धाही याला अपवाद नाही.
मुंबई : 2025 च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला खेळाडूंची जगभरात डिमांड वाढत आहे, इंग्लंडमधली द हंड्रेड स्पर्धाही याला अपवाद नाही. टीम इंडियाची ओपनर स्मृती मानधनाच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेटपटू द हंड्रेडच्या ड्राफ्टमध्ये होत्या. रिचा घोषला 50 हजार पाऊंड (जवळपास 61 लाख रुपये) मिळाले. तर टीम इंडियाची ऑलराऊंडर दीप्ती शर्मासोबतही द हंड्रेडच्या टीमने करार केला आहे.
ड्राफ्टमध्ये एकूण 178 खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती, त्यापैकी 28 खेळाडूंना स्पर्धेपूर्वी फ्रँचायझींनी रिटेन केलं होते किंवा थेट करार करून विकत घेतलं होतं. ही लीग 21 जुलै रोजी सुरू होईल आणि 16 ऑगस्ट रोजी संपेल. रिचा घोषला मँचेस्टर सुपर जायंट्सने 50 हजार पाऊंड्स मध्ये विकत घेतले. भारतीय विकेटकीपर-बॅटरसाठी बोली लावणारी ही फ्रँचायझी एकमेव होती.
advertisement
मंधाना मँचेस्टर सुपर जायंट्समध्ये
मँचेस्टर सुपर जायंट्सने यापूर्वी मंधानासोबत ऑस्ट्रेलियन दिग्गज मेग लॅनिंगला थेट करार करून, तर इंग्लंडची स्पिनर सोफी एक्लेस्टोनला कायम ठेवून आपला संघ मजबूत केला होता. मँचेस्टर सुपर जायंट्सने स्मृतीला 50 हजार पाऊंड (जवळपास 61 लाख रुपये) दरम्यान, दीप्तीला सनरायझर्स लीड्सने 27,500 पाऊंड (अंदाजे 34 लाख रुपये) मध्ये विकत घेतले. टीम इंडियाची ऑलराऊंडर असलेल्या दीप्ती शर्मासाठी दुसऱ्या कोणत्याही टीमने बोली लावली नाही, तर यास्तिका भाटिया आणि श्री चरणी यांना निराश व्हावं लागलं, कारण त्यांना कोणत्याच टीमने विकत घेतलं नाही.
advertisement
'द हंड्रेड' मधील बजेट
प्रत्येक महिला फ्रँचायझीकडे त्यांची टीम तयार करण्यासाठी 8,80,000 पाऊंडचे बजेट होते. बर्मिंगहॅम फिनिक्स, लंडन स्पिरिट, सदर्न ब्रेव्ह आणि ट्रेंट रॉकेट्स यांचे ड्राफ्टपूर्वी 5,20,000 चे बजेट होते. मँचेस्टर सुपर जायंट्स, एमआय लंडन, सनरायझर्स लीड्स आणि वेल्श फायर यांचे बोली सुरू होण्यापूर्वी 5,70,000 पाऊंडचे बजेट होते. 2025 ची महिला हंड्रेड स्पर्धा नॉर्दर्न सुपरचार्जर्सने जिंकली. 31 ऑगस्ट 2025 रोजी लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सदर्न ब्रेव्हचा 7 विकेट राखून पराभव करून त्यांनी त्यांचे पहिले विजेतेपद जिंकले. फायनलमध्ये अॅनाबेल सदरलँडने भूमिका केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 11:40 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'द हंड्रेड'मध्ये स्मृती मानधनाची एन्ट्री, 50 हजार पाऊंडची बोली, टीम इंडियाच्या पोरीही मालामाल!









