फारूख अब्दुल्ला उपस्थित असलेल्या लग्न समारंभात गोळीबार, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी जखमी
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
जम्मूमधील ग्रेटर कैलाश परिसरातील रॉयल पार्क येथे एका लग्न समारंभादरम्यान गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू : जम्मूमधील ग्रेटर कैलाश परिसरात असलेल्या हॉटेल रॉयल पार्क येथे आयोजित एका लग्न समारंभादरम्यान अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. या समारंभाला राज्याचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी तसेच पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांना छर्रे लागून किरकोळ दुखापत
हाती आलेल्या माहितीनुसार समारंभ सुरू असतानाच एका व्यक्तीने अचानक पिस्तूल काढून हवेत गोळीबार सुरू केला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत हल्लेखोराला पकडून ताब्यात घेतले.
J&K Police say, "An incident of firing was reported at a function where JKNC chief Farooq Abdullah and Deputy CM Surinder Choudhary were present. One person has been arrested. More details awaited."
— ANI (@ANI) March 11, 2026
advertisement
या घटनेत उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांना गोळीबारातील छर्रे लागल्यामुळे किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे फारूक अब्दुल्ला हे पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. हल्लेखोराची ओळख जम्मूतील स्थानिक रहिवासी कमल सिंह जम्वाल अशी झाली आहे. या गोळीबारामागील नेमके कारण काय होते, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
Location :
Srinagar,Jammu and Kashmir
First Published :
Mar 11, 2026 11:07 PM IST
मराठी बातम्या/देश/
फारूख अब्दुल्ला उपस्थित असलेल्या लग्न समारंभात गोळीबार, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी जखमी










