advertisement

छत्री घेऊन घराबाहेर पडा, सोसाट्याचा वारा अन् गारपिटीचा इशारा, 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Last Updated:

पाकिस्तान व अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांनी दिशा बदलली. महाराष्ट्रात पावसाची चिन्हं दिसत आहेत. स्कायमेटने पुढच्या २४-४८ तासांत मुंबईत पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

महाराष्ट्रात पावसाचं संकट
महाराष्ट्रात पावसाचं संकट
आतापर्यंत अगदी घामाच्या धारांनी हैराण व्हायला होत होतं, मात्र आता वादळी वारे आणि गारपिटीचा तडाखा बसणार आहे. पाकिस्तानकडून येणारे वारे आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांनी अचानक आपली दिशा बदलली. तर उत्तरेला सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. त्यामुळे तापलेल्या महाराष्ट्रात आता पावसाची चिन्हं दिसू लागली आहेत. उन्हाच्या झळा आणि हीटवेव्हचा इशारा असतानाच, ढगाळ वातावरणामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उन्हाच्या चटक्यात पावसाची एन्ट्री?
सध्या महाराष्ट्राच्या डोक्यावर दोन टोकाची हवामान संकटं घोंघावत आहेत. एकीकडे ठाणे, मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या ५ जिल्ह्यांमध्ये हीटवेव्हचा अलर्ट आहे, तर दुसरीकडे याच उष्णतेमुळे बाष्प तयार होऊन अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. अरबी समुद्राकडून येणारे वारे आता वेगाने ओलावा घेऊन उत्तर महाराष्ट्राकडे सरकत आहेत.
advertisement
स्कायमेटने वर्तवला अंदाज
स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, पुढच्या २४ ते ४८ तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहील. यामुळे उकाडा प्रचंड वाढणार असला, तरी काही ठिकाणी अचानक सरप्राईज पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात उष्णता असली, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार शक्यता आहे.
advertisement
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?
१४ मार्चनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वादळी वारे आणि गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे १४ आणि 15 मार्च रोजी शेतकऱ्यांनाही काळजी घेण्याच्या सूचना IMD ने दिल्या आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र इथे दमट आणि उष्ण हवामानामुळे उकाडा जास्त जाणवण्याची शक्यता आहे. तर पाऊस होऊन गेल्यानंतर पुन्हा उकाडा जास्त वाढण्याची भीती आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्री घेऊन घराबाहेर पडा, सोसाट्याचा वारा अन् गारपिटीचा इशारा, 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement