advertisement

Special Masala : घरच्यांना मसालेदार भाज्या आवडतात? बनवा कोणत्याही भाजीची चव वाढवणारा 'यसूर मसाला'!

Last Updated:

How to make special yasur masala : आजचा हा यसूर मसाला एक कोरडा आणि अनेक दिवस टिकणारा मसाला आहे. जेव्हाही तुम्ही एखादी मसाल्याची बनवाल त्यामध्ये हा मसाला थोडासा टाका. याने तुमच्या भाजीला चवही येते आणि भाजी घट्टदेखील होते.

यसूर मसाला बनवण्याची सोपी पद्धत..
यसूर मसाला बनवण्याची सोपी पद्धत..
मुंबई : मसाल्याच्या भाज्या बऱ्याच लोकांना आवडतात. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा तरी मसाल्याच्या भाज्या बनतातच. यासाठी घरात खूप वेगवेगळे मसाले आपण वापरतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका मसाल्याबद्दल सांगत आहोत, जो बनवायला खूप सोपा आहे आणि हा मसाला तुमच्या प्रत्येक भाजीला अप्रतिम चव देतो.
आजचा हा यसूर मसाला एक कोरडा आणि अनेक दिवस टिकणारा मसाला आहे. जेव्हाही तुम्ही एखादी मसाल्याची बनवाल त्यामध्ये हा मसाला थोडासा टाका. याने तुमच्या भाजीला चवही येते आणि भाजी घट्टदेखील होते. या मसाल्याची रेसिपी shitalkumavatt या इंस्टाग्राम चॅनलवर शेअर केली गेली आहे. चला तर बनवूया यसूर मसाला.
यसूर मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- 1 वाटी बाजरी
advertisement
- 1/4 कप चणा डाळ
- 2 चमचे तांदूळ
- 1 चमचा जिरे
- 1 चमचा बडीशेप
- 10 ते 15 लवंगा
- 10 ते 15 मिरे
- 1 ते 2 तुकडे दालचिनी
- 3 ते 4 वेलची
- 2 तमालपत्र
यसूर मसाला बनवण्याची सोपी पद्धत..
- हा मसाला बनवणं अगदी सोपं आहे.
advertisement
- यासाठी एक मोठी कढई घ्या आणि गॅसवर ठेवा.
- आता या कढईमधे वरील प्रमाणानुसार बाजरी, चणा डाळ, तांदूळ आणि जिरे टाका.
- त्याचसोबत बडीशेप, लवंगा, मिरे, दालचिनी, वेलची आणि तमालपत्रदेखील टाका.
- हे सर्व गॅस सुरु करून व्यवस्थित भाजून घ्या.
- भाजलेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याची बारीक पावडर बनवा.
advertisement
advertisement
अशाप्रकारे हा यसूर मसाला बनून तयार होतो. हा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता. याने तुमच्या भाजीची चव निश्चितच वाढेल. एकदा नक्की बनवून पाहा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Special Masala : घरच्यांना मसालेदार भाज्या आवडतात? बनवा कोणत्याही भाजीची चव वाढवणारा 'यसूर मसाला'!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement