सावध राहा! हडपसरच्या भाजी मंडईत फिरत होते दोघं; खिशात सापडली पिवळ्या रंगाची 'ती' वस्तू, तपासात धक्कादायक खुलासा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
हडपसर भाजी मंडई परिसरात हे दोघे संशयास्पद रित्या वावरत असल्याची माहिती मिळाली. तपासणीत त्यांच्या खिशात दोन पिवळ्या धातूची बिस्कीटं आणि बनावट साखळी सापडली
पुणे : बनावट सोनं देऊन फसवणूक करण्याच्या अनेक घटना आजकाल समोर येत आहे. असंच ज्येष्ठ महिलांना गाठून त्यांना बनावट सोन्याची बिस्किटे खरी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या एका सराईत टोळीला पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. हडपसर परिसरात सापळा रचून केलेल्या या कारवाईत दोन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बनावट सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अशी झाली अटक
अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जाधव (वय ५२, रा. जळकोट, लातूर) आणि अमोल बाबूगिरी (वय ३२, रा. अहमदपूर) यांचा समावेश आहे. दिलीप स्वामी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अपहरण आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. हडपसर भाजी मंडई परिसरात हे दोघे संशयास्पद रित्या वावरत असल्याची माहिती पोलीस हवालदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांना मिळाली. तपासणीत त्यांच्या खिशात दोन पिवळ्या धातूची बिस्कीटं आणि बनावट साखळी सापडली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिताफीने दोघांना ताब्यात घेतले.
advertisement
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी २४ जुलै रोजी कसबा पेठेतील लाल महाल परिसरात एका ज्येष्ठ महिलेला स्वस्तात सोन्याचे बिस्किट देण्याचे आमिष दाखवून तिचे दागिने या टोळीने लांबवले होते. तसेच सातारा जिल्ह्यातील कराडमध्येही एका महिलेचे मंगळसूत्र अशाच पद्धतीने लंपास केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यांच्या झडतीत पोलिसांना पिवळ्या धातूची दोन बिस्किटे आणि बनावट सोन्याची साखळी सापडली आहे.
advertisement
भररस्त्यात गाठून "आमच्याकडे सोन्याचे बिस्किट आहे, ते स्वस्तात देतो," असे सांगून ही टोळी महिलांचा विश्वास संपादन करायची आणि त्यांचे खरे दागिने घेऊन पोबारा करायची. या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 10:11 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सावध राहा! हडपसरच्या भाजी मंडईत फिरत होते दोघं; खिशात सापडली पिवळ्या रंगाची 'ती' वस्तू, तपासात धक्कादायक खुलासा









