advertisement

Idli Recipe : इडली बनवण्याची नवीन पद्धत; यासोबत सांबार, चटणी कशाचीच गरज नाही

Last Updated:

Idli Recipe Video : इडली म्हणजे सोबत सांबार, चटणी आलीच पण आता इडली बनवण्याची पद्धत बदला तुम्हाला सांबार, चटणीचीही गरज पडणार नाही.

News18
News18
एक होती इडली, ती होती चिडली, धावत धावत आली, सांबारात बुडाली.... ही कविता तुम्हाला माहितीच आहे. इडली म्हणजे सांबार किंवा चटणी आलीच. नुसती इडली कोरडी लागते. त्यामुळे त्याच्यासोबत सांबार, चटणी हवीच. पण एक अशी इडली जी खाण्यासाठी तुम्हाला सांबार, चटणी कशाचीच गरज पडणार नाही.
सामान्यपणे इडली कशी बनवतात तर इडलीसाठी तांदूळ, उडीद डाळ भिजवून वाटतात, आंबवतात आणि हे पीठ इडली पात्रात टाकून वाफवतात. ही गरमागरम इडली सांबार आणि चटणीसोबत खाल्ली जाते. पण आता इडली बनवण्याची नवीन पद्धत, या पद्धतीने तुम्ही इडली बनवली तर तुम्हाला ती सांबार चटणीसोबत खाण्याची गरजच नाही.
advertisement
आता फार वेळ न घालवता ही इडली बनवायची कशी? त्या रेसिपीकडेच वळुयात. मिक्सरच्या भांड्यात एक वाटी रवा, अर्धी वाटी दही, चवीपुरतं मीठ आणि थोडं पाणी टाकून त्याचं स्मूथ पीठ तयार करून घ्या. हे पीठ झाकूण ठेवा.
आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे-मोहरी, हिंग, कडीपत्त्याची फोडणी द्या. यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला गाजर आणि बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून परतून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात आणखी इतर भाज्या टाकू शकता. आता यात हळद आणि लाल तिखट घालून परतून घ्या. आता उकडलेला बटाटा कुस्करून टाका आणि मसाला चांगला एकत्र करून घ्या. याचे मुठीत वळून लांब गोळे बनवून घ्या.
advertisement
आता मघाशी ठेवलेलं पीठ घ्या. त्यात इनो टाका. मोठे ग्लास घ्या, त्याला तेल लावून थोडं पीठ ओता. या पीठात तयार केलेला मसाल्याचा गोळा उभा ठेवा आणि वरून पुन्हा पीठ ओता. आता हे ग्लास इडली पात्रात ठेवून 10 मिनिटं वाफवून घ्या.
advertisement
ग्लासमध्ये इडली तयार झाली आहे, ती बाहेर काढून त्याचे गोल काप करून घ्या. याच्या आतच मसाला असल्याने याला वेगळी चटणी किंवा सांबारची गरज नाही. ही इडली तुम्ही अशीच खाऊ शकता. मुलांनाही शाळेत नेण्यासाठी टिफिनमध्ये ही इडली तुम्ही देऊ शकता.












View this post on Instagram























A post shared by Bharti Rokade (@aapli_sakhi)



advertisement
@aapli_sakhi इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हीही या पद्धतीने इडली ट्राय करून पाहा आणि कधी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Idli Recipe : इडली बनवण्याची नवीन पद्धत; यासोबत सांबार, चटणी कशाचीच गरज नाही
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement