advertisement

Suryakumar Yadav : टीम इंडियाने अचानक हॉटेल का चेंज केलं? 32000 फुटावर घेतलेला निर्णय, सूर्याने सांगितलं खरं कारण!

Last Updated:

Suryakumar On Why team India Change hotel : आम्ही गेल्या 18 महिन्यापासून टीम कल्चर रूजवण्याचा प्रयत्न करत होतो. टीममध्ये चेंजमध्ये काहीच उरलं नव्हतं, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

Why team India Change hotel before semifinal suryakumar Yadav
Why team India Change hotel before semifinal suryakumar Yadav
Suryakumar Yadav on team India Change hotel : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल सुरू होणार होती, त्याचवेळी गंभीरने एक वाक्य वापरलं अन् टीम इंडिया सुसाट सुटली. तुम्ही 100 बायलॅटरल मॅचेस जिंकल्या असतील तर त्याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही एक वर्ल्ड कप जिंकला तर फरक पडतो, असं गंभीर म्हणाला अन् टीम इंडिया वाऱ्याच्या वेगात खेळली. वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकल्यानंतर सूर्याने खुलासा केला. त्यावेळी त्याने हॉटेल का चेंज केलं? यावर देखील खुलासा केला.

टीम कल्चर रूजवण्याचा प्रयत्न

आम्ही गेल्या 18 महिन्यापासून टीम कल्चर रूजवण्याचा प्रयत्न करत होतो. टीममध्ये चेंजमध्ये काहीच उरलं नव्हतं. मुंबईत इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यापूर्वी, शेवटच्या क्षणी हॉटेल बदलण्यात आलं. "आम्ही सेमीफायनल सामन्यासाठी फ्लाइटमध्ये होतो तेव्हा कोणीतरी नवीन हॉटेल वापरून पाहण्याचा सल्ला दिला. अनेक संघांनी असं केलं आहे. आम्हाला आमच्या ध्येयाच्या जवळ नेणारी कोणतीही गोष्ट टेबलावर ठेवायची नव्हती, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement

स्टेडियममध्ये कोणतीही अडचण नाही

ज्या स्टेडियमवर 2023 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता आणि जिथे या टीमला संघर्ष करावा लागला होता, त्याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांनी अखेर ट्रॉफी जिंकली. "आता आम्हाला खात्री पटली आहे की, स्टेडियममध्ये कोणतीही अडचण नाही," असे सूर्या म्हणाला. या प्रवासातील महत्त्वाचे वळण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्रुप स्टेजमध्ये आलेल्या कठीण प्रसंगानंतर आलं. त्यावेळी मी टीमचा अनुभवी ऑल-राउंडर हार्दिक पांड्याला जबाबदारी सोपवली होती, असंही सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement

पुन्हा नव्या जोशाने मैदानात

दरम्यान, टीम इंडिया ज्याप्रकारे वर्ल्ड कप खेळली, त्याचा मला अभिमान आहे. आम्ही कोणत्याही क्षणी डगमगलो नाही. साऊथ अफ्रिकेच्या पराभवानंतर सर्व खेळाडू पुन्हा विजयासाठी तयार झाले. पांड्या सर्वांमध्ये स्पुर्ती निर्माण केली. त्यामुळे खेळाडू पुन्हा नव्या जोशाने मैदानात उतरले अन् टीम इंडियाच्या संघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळवता आला, असं सूर्य़कुमार यादव म्हणाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : टीम इंडियाने अचानक हॉटेल का चेंज केलं? 32000 फुटावर घेतलेला निर्णय, सूर्याने सांगितलं खरं कारण!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement