advertisement

Mumbai : आखातामधील युद्धामुळं लालबागच्या 'लाडू सम्राट'चं शटर बंद! मुंबईतील खवय्यांचे वांदे,कारण काय?

Last Updated:

Ladu Samrat Closed : मुंबईकर जर तुम्ही लालबागमधील एका प्रसिद्ध हॉटेलमधून खाद्यपदार्थ खात असताल तर तुम्हाला आता ते खाता येणार नाही. कारण इराण-अमेरिका युद्धाचा फटका यांना बसला आहे.

लालबागची शान असलेल्या लाडू सम्राटला गॅस टंचाईचा फटका
लालबागची शान असलेल्या लाडू सम्राटला गॅस टंचाईचा फटका
मुंबई : मुंबईतील प्रत्येक नागरिकाचे असे एखादे हक्काचे आणि आवडीचे हॉटेल असते जिथून ते पिढ्यानपिढ्या खाद्यपदार्थ विकत घेत असतात. त्यात मुंबई शहराची ओळख असलेल्या लालबागमधील एक दुकान म्हणजे प्रसिद्ध लाडू सम्राट. मात्र हे दुकान आहे इराण-अमेरिका युद्धामुळे बंद करण्यात आलेले आहे. मात्र यामागील मुख्य कारण काय आणि परत हे दुकान खाद्य प्रेमींसाठी कधी खुले होईल त्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्य कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून देशभरात इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम हा गॅस तुटवड्याच्या दिशेने दिसत आहे. त्यातच लालबागमधील प्रसिद्ध लाडू सम्राट उपहारगृहाला बुधवारी गॅस टंचाईमुळे ते बंद करावे लागेल. या उपहारगृहाची ओळख म्हणजे दररोज हे 10,000 वडापाव विकत होते मात्र या पाठोपाठ आता दादरमधील आदर्श उपहार गृह तर परळ परिसरातील काही छोटी-मोठी हॉटेल्स गॅस पुरवठ्यामुळे बंद झालेली आहेत.
advertisement
रुग्णांच्या नातेवाईकांसमोर मोठे संकट
हॉटेल्स नंतर या टंचाईचा मोठा फटका मुंबईतील केईएम आणि टाटा मेमोरियल रुग्णालयाबाहेर जेवण करणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना बसत आहे. स्वस्त दरात थाळी देणारी अनेक हॉटेल्स बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक हॉटेल मालक आता इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय शोधत आहेत परंतु मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करण्यासाठी हे पर्याय पुरेसे ठरत नाहीत.
advertisement
हॉटेल बंद, आता जगायचे कसे
या संकटाचा सर्वात गंभीर परिणाम हॉटेल कामगारांवर झाला आहे. अनेक कामगार परराज्यातील असून काम बंद राहिल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर पुढील तीन ते चार दिवसांत पुरवठा सुरळीत झाला नाह तर या कामगारांवर गावी परतण्याची वेळ येऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : आखातामधील युद्धामुळं लालबागच्या 'लाडू सम्राट'चं शटर बंद! मुंबईतील खवय्यांचे वांदे,कारण काय?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement