इराणचा नवा सुप्रीम लीडरही कोमात? एक पायही गमावला, मोजतबा खामेनींबद्दल खळबळजनक दावा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Iran-Israel War News Update: इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर या युद्धाची धग आखाती राष्ट्रांमध्ये पसरली आहे. आता इराणचे नवीन सुप्रीम लीडर मोजतबा खामेनींबद्दल मोठा दावा केला जात आहे.
Iran-Israel War News Update: आखाती देशात युद्धाचा भडका उडाला आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर या युद्धाची धग आखाती राष्ट्रांमध्ये पसरली आहे. येथील स्थिती आता भीषण झाली आहे. हे युद्ध धुमसत असताना आता इराणमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ते सध्या 'कोमा'मध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन' ने याबाबत मोठा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर, इराणच्या नव्या सुप्रीम लीडरचा एक पाय कापण्यात आला असून त्यांच्या यकृत आणि पोटाला गंभीर जखमा झाल्याचंही या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
नेमका दावा काय?
'द सन'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मोजतबा खामेनी यांना तेहरानमधील सिना युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये कडक सुरक्षेत आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. इराणचे आरोग्य मंत्री आणि नामवंत सर्जन मोहम्मद रजा जफरगंदी स्वतः त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या ज्या हल्ल्यात आयतुल्लाह अली खामेनी यांचा मृत्यू झाला, त्याच हल्ल्यात मोजतबा हे देखील गंभीर जखमी झाले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement
नेमका संशय कशामुळे बळावत आहे?
खरं तर आयतुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर मोजतबा खामेनी यांची इराणच्या सुप्रीम लीडर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सुप्रीम लीडर झाले असले तरी २८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून मोजतबा एकदाही लोकांसमोर आलेले नाहीत. ८ मार्च रोजी त्यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्यावर ते देशाला संबोधित करतील, असं सांगण्यात आलं होतं, मात्र तसं झालं नाही.
advertisement
सुप्रीम लीडरपदी नियुक्ती झाल्यानंतर ५ दिवसांनंतर त्यांचा पहिला संदेश समोर आला होता. पण तो टीव्हीवर एका अँकरने वाचून दाखवला. मोजतबा स्वतः कॅमेऱ्यासमोर आले नाहीत. एवढंच नव्हे तर इराणच्या सरकारी टीव्हीवर अँकर्सनी त्यांचा उल्लेख 'रमजान युद्धाचा जांबाज' म्हणजेच 'घायल योद्धा' असा केला आहे, ज्यामुळे ते दुखापतग्रस्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.
advertisement
राष्ट्रपतींशी गुप्त भेट?
'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी दोन दिवसांपूर्वी गुप्तपणे हॉस्पिटलमध्ये जाऊन मोजतबा यांची भेट घेतली. दरम्यान, मोजतबा यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पहिल्या संदेशात त्यांनी 'होर्मुज स्ट्रेट'ची नाकेबंदी सुरूच राहील आणि खाडी देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, असा इशारा दिला आहे. इराण सरकारने अद्याप या दाव्यांची अधिकृत पुष्टी केलेली नाही, मात्र मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबतच्या गूढामुळे जागतिक राजकारणात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Location :
Delhi
First Published :
Mar 13, 2026 9:04 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
इराणचा नवा सुप्रीम लीडरही कोमात? एक पायही गमावला, मोजतबा खामेनींबद्दल खळबळजनक दावा








