advertisement

बीडमध्ये लेकाकडून बापाला अमानुष मारहाण, हातपाय बांधायला स्कॉर्पिओमध्ये टाकून नेलं, धडकी भरवणारा CCTV VIDEO

Last Updated:

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवण करून देणारी अमानुष घटना बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात घडली आहे. इथं एका तरुणाने रक्ताचं नातं विसरून आपल्या वडिलांना आणि बहिणीला बेदम मारहाण केली आहे.

बीडमध्ये मुलाकडून बाप अन् बहिणीला अमानुष मारहाण
बीडमध्ये मुलाकडून बाप अन् बहिणीला अमानुष मारहाण
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवण करून देणारी अमानुष घटना बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात घडली आहे. इथं एका तरुणाने रक्ताचं नातं विसरून आपल्या वडिलांना आणि बहिणीला बेदम मारहाण केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने जखमी बापाला स्कॉर्पिओ गाडीत कोंबून घेऊन गेला. आरोपीनं सासरच्या मंडळींच्या मदतीने स्वत:च्याच कुटुंबावर हल्ला केला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुण एकुलता एक मुलगा आहे. सुभाष ठोंबरे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. आरोपीनं बहिणीसह आपल्या मेहुण्याला देखील मारहाण केली आहे. या प्रकरणी मुलगा लक्ष्मण ठोंबरे, सून सारिका ठोंबरे, यांच्यासह सासरच्या १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

नेमकी घटना काय आहे?

advertisement
बीडच्या केज तालुक्यातील नाव्होली गावात ही घटना घडली. इथं मुलानेच सासरच्या लोकांना सोबत घेऊन वडिलांसह बहीण आणि मेहुण्याला डोळ्यात चटणी टाकून लोखंडी पाईप आणि बेल्टने अमानुष मारहाण केली. यामध्ये सुभाष ठोंबरे हे गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. मुलाकडूनच बापाला अशाप्रकारे अमानुष झालेल्या मारहाणीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
advertisement
एकुलत्या एक मुलाने संपत्तीसाठी ट्रॅक्टर आणि जमीन नावावर करून दे म्हणत स्वतःच्या वडिलांसह वाद मिटवण्यासाठी आलेल्या बहीण आणि मेहुण्याला देखील मारहाण केली. यानंतर मुलाने वडिलांला हातपाय बांधून टाकण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीत घेऊन गेल्याचा आरोप होत आहे. या मारहाणीचा एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. काही फोटो समोर आले असून मारहाण झाल्याचे अंगावर मोठे व्रण दिसत आहेत. यावरून ही मारहाण किती भीषण होती, याचा अंदाज येत आहे. काल रात्री 8 ते 9 च्या दरम्यान ही घटना घडली असून जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात केज पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. व्हिडीओत हिंसक मारहाण आणि अश्लील शिवीगाळ असल्याने न्यूज १८ मराठी हा व्हिडीओ प्रसारीत करत नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
बीडमध्ये लेकाकडून बापाला अमानुष मारहाण, हातपाय बांधायला स्कॉर्पिओमध्ये टाकून नेलं, धडकी भरवणारा CCTV VIDEO
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement