advertisement

Kitchen Tricks : तांब्याची भाडी आवडतात, पण चकचकीत कशी ठेवायची? इथं आहे तुमच्या टेंशनवरचं सोपं उत्तर

Last Updated:
Method for Cleaning Copper Vessels : तांब्याची भांडी दिसायला खूप सुंदर दिसत असली तरी ती तशीच ठेवणं हे फार मोठं आव्हान असतं. कारण तांब्याची भांडी काही काळ पडून राहिल्यास ती काळी पडू लागतात आणि जुनी दिसू लागतात. वापरात नसेल तर त्याची चमक पूर्णपणे निघून जाते. तुमच्या घरात देखील अशी काही भांडी पडून असतील आणि ती काळी झाली असतील तर तुम्ही एक सोपा घरगुती उपाय करून ते चमकवू शकता.
1/7
तांबे आणि पितळेची भांडी वापरण चांगलं मानलं जात. परंतु ती कालांतराने काळी पडू लागतात. चमक गेल्याने ती जुनी आणि अस्वच्छ दिसू लागतात. अनेक जण ही भांडी घासण्यासाठी डिशवॉशर किंवा महागड्या क्लीनरचा वापर करतात. परंतु अनेकदा त्यात नवी असल्यासारखी चमक येत नाही.

2/7
तुमच्या घरातील तांबे किंवा पितळेची भांडी काळी पडली असतील तर तुम्हाला महागड्या क्लीनरवर पैसे खर्च करण्याची गरज नाही. तसेच ती घासण्यासाठी खूप मेहनत घेण्याचीही गरज नाही. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने एक घरगुती उपाय करून ते स्वच्छ करू शकता आणि आधीसारखी चमकवू शकता.

3/7
उत्तर प्रदेशातील आजमगड येथील भांडी विक्रेते शुभम कसेरा सांगतात की, तांबे किंवा पितळेची भांडी चमकवण्यासाठी लिंबाचा रस, मीठ, हळद आणि गव्हाच्या पिठाचा वापर केला जाऊ शकतो. या घरगुती उपायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला बाजारातून काहीही विकत आणण्याची गरज नाही. सर्व साहित्य तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते.

4/7
हे घरगुती 'क्लीनिंग पेस्ट' तयार करण्यासाठी सर्वात आधी एका वाटीत 2 ते 3 चमचे गव्हाचे पीठ घ्या. त्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ मिसळा. त्यानंतर एक ताजा लिंबू कापून त्याचा रस या मिश्रणात पिळा आणि ते नीट एकत्र करून घ्या. ही पेस्ट योग्य प्रकारे तयार करण्यासाठी तुम्ही त्यात थोडं पाणी देखील घालू शकता.

5/7
तयार झालेली ही पेस्ट तुमच्या काळ्या पडलेल्या तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यावर सर्व बाजूंनी व्यवस्थित लावा. त्यानंतर साधारण 10 ते 15 मिनिटे हे भांडे तसेच राहू द्या. लिंबाच्या रसातील सिट्रिक ॲसिड आणि मिठाचे नैसर्गिक गुणधर्म भांड्यावरील काळेपणा आणि साचलेली घाण सैल करण्यास मदत करतात.

6/7
पेस्ट लावल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर एका कापडाने भांडे नीट पुसून घ्या किंवा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. तुमचे जुने आणि काळे पडलेले भांडे पुन्हा एकदा नवे आणि चकचकीत दिसू लागतील.

7/7
या उपायाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात कोणत्याही हानिकारक रसायनाचा वापर केलेला नाही. यामुळे भांड्याचा थर सुरक्षित राहतो आणि तुमच्या हातांनाही कोणतीही इजा होत नाही. तुमच्या तांबे-पितळेच्या भांड्यांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही वेळोवेळी या पेस्टचा वापर करू शकता. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.)

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement