अरेरे! मराठी मालिकांच्या सेटवर कलाकारांचे 'हाल', जेवण सोडा साधा चहाही नाही! का झालेत खाण्यापिण्याचे वांदे?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Marathi Serial : मराठी टीव्ही मालिकाच्या सेटवरील कलाकारांना घरून डबे आणायला सांगितले आहेत. त्यांना आता चहा-कॉफीही मिळेनासा झाला आहे. याचं कारण म्हणजे...
फिल्म किंवा मालिकांचा सेट म्हटलं की तिथं जेवणाचे डबे येतात. कलाकारांची भरपूर खाणं-पिणं असतं. कित्येक कलाकारांनी आपल्या सेटवरील ही खाण्यापिण्याचं चंगळ सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करतही दाखवली आहे, तुम्हीही ते पाहिलं असेल. भात, आमटी, पोळी, भाजी असे किती तरी प्रकार तिथं असतात. पण आता जेवण सोडा टीव्ही मालिकाच्या कलाकारांचे साधा चहा पिण्याचेही वांदे झाले आहेत.
advertisement
वीण दोघातली ही तुटेना या मालिकेचे निर्माते हेमंत सोनवणे यांनी सांगितलं की, पूर्वी जेवणात पोळी, भाजी, आमटी, भात असे अनेक पदार्थ दिले जायचे. पण आता पुलाव, खिचडी, बिर्याणी असा एकच पदार्थ दिला जातो. अधेमधे चहा-कॉफीऐवजी लिंबू सरबत, कोकम सरबत, ताक दिलं जातं. काही दिवसांनी कदाचित सेटवर येणारं जेवण बंद होण्याचा फूड मॅनेजरने दिला आहे. सेटवर गरजेसाठी इंडक्शन आणलं आहे.
advertisement
काही मालिकांच्या सेटवर चुलीवरचं जेवण पुरवलं जाऊ लागलं आहे. पण आता लाकडाच्या किंमतीही वाञल्याने गॅसला पर्याय असलेल्या या गोष्टीसमोरही दरवाढीचं आव्हान आहे. ठाण्यातील शूटिंग सेटवर जेवण पुरवणारे तुषार भोईर म्हणाले, एलपीडी गॅस तुटवड्यामुळे मी चुलीवर स्वयंपाक करून सेटवर जेवण देत आहे. सध्या मी माझ्या शेतातील सुकलेल्या झाडाची लाकडं वापरत आहे. पण चुलीवर इतक्या पोळ्या करणं शक्य नाही. त्यामुळे कधी मसाले भात, पुलाव दिला जातो.
advertisement
तुला जपणार आहे आणि तू अनोळखी तरी सोबती मालिकेचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर मनीष दळवी म्हणाले, आमच्या एका मालिकेच्या सेटवर जेवण येणं बंद झालं आहे. पण त्यांना चुलीवरचं जेवण देणं काही दिवसच शक्य होणार आहे. आम्ही कलाकार आणि सेटवरील इतर सगळ्यांना डबे आणायला सांगितलेत. पण यासाठी पुरेसा वेळ हवा. त्यामुळे शूटिंग उशिरा सुरू करावी लागेल. याचा परिणाम कामाच्या तासावर होऊन ताण वाढेल, असं त्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितलं.
advertisement
टीव्ही मालिकांच्या सेटवर अशी वेळ का आली आहे? तर याचं कारण आहे, अमेरिके, इस्राइल आणि इराणमधील युद्ध. ज्याचा परिणाम जागतिक इंधन पुरवठ्यावर झाला आहे आणि एलपीजी गॅसचचा तुटवडा आहे. त्याची झळ मराठी मालिकांच्या सेटनाही लागली आहे. मराठी मालिकांच्या सेटवर जेवण पुरवणाऱ्यांना आव्हानांना सामोरं जावं लागतं आहे. (सर्व फोटो : AI Generated)









