advertisement

MI vs RR : वैभवची बुमराहसमोर 'अग्निपरीक्षा' पण, पांड्या IN मग OUT कोण? मुंबई इंडियन्स 2 स्टार खेळाडूंना देणार डच्चू!

Last Updated:

MI vs RR Vaibhav Suryavanshi vs Jasprit Bumrah : हार्दिक पंड्या आता फिट असल्याने तो राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे सूर्याकडे मुंबईची कॅप्टन्सी नसेल. पण यामुळे मुंबईला दोन चेंज करावे लागतील.

MI vs RR Vaibhav Suryavanshi vs Jasprit Bumrah
MI vs RR Vaibhav Suryavanshi vs Jasprit Bumrah
Mumbai Indians vs Rajasthan Royal : आयपीएलच्या ज्या सामन्याची सर्वांना प्रतिक्षा होती, तो सामना आज खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रोमांचक सामना खेळवला जाईल. 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी पाच वेळच्या चॅम्पियन्स असलेल्या मुंबई इंडियन्ससमोर कशी बॅटिंग करतो, हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अशातच बुमराहसमोर वैभव सूर्यवंशीची बॅटिंग पाहणं डोळ्याचं पारणं फेडणारं असेल. अशातच आता टीम इंडियात येण्यापूर्वी वैभवची हीच खरी अग्निपरीक्षा असेल, असं मानलं जातं आहे.

हार्दिक पांड्याकडे मुंबईची कॅप्टन्सी

गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्सने दोन मॅचमध्ये एकातच विजय मिळवलाय. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स दोन्ही मॅच जिंकून मुंबईच्या समोर उभी ठाकणार आहे. अशातच मुंबई इंडियन्स आपल्या ओरिजनल कॅप्टनसोबत मैदानात उतरेल. हार्दिक पंड्या आता फिट असल्याने तो राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे सूर्याकडे मुंबईची कॅप्टन्सी नसेल. पण यामुळे मुंबईला दोन चेंज करावे लागतील.
advertisement

मुंबई इंडियन्स दोघांना देणार नारळ

हार्दिक पांडयाचं कमबॅक झाल्यानंतर आता शेर्फेन रूदरफोर्ड आणि कॉर्बिन बॉश यांना पुन्हा बेंचवर बसावं लागेल. तर विल जॅक्सला संधी मिळणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळण्याची शक्यता आहे. तर नमन धीर याला देखील बाहेर बसवलं जाऊ शकतं. मुंबई इंडियन्स या मॅचमध्ये युवा खेळाडूंना संधी देणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल.
advertisement

वैभवची बॅटिंग चालणं महत्त्वाचं

दरम्यान, राजस्थान रॉयल्ससाठी वैभवची बॅटिंग चालणं महत्त्वाचं आहे. तसेच ध्रुव जुरेल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर या तिन्ही बॅटर्सला आपली किमया दाखवावीच लागणार आहे. तसेच रवींद्र जडेजा आणि जोफ्रा आर्चर यांचा अनुभव मुंबई इंडियन्सविरुद्ध महत्त्वाचा असेल. तर रवी बिश्नोईच्या फिरकीची जादू देखील विजय मिळवून देऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs RR : वैभवची बुमराहसमोर 'अग्निपरीक्षा' पण, पांड्या IN मग OUT कोण? मुंबई इंडियन्स 2 स्टार खेळाडूंना देणार डच्चू!
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement