Ashok Kharat Case : खरातचा कांड बाहेर काढणारी स्पेशल 4 टीम, 4650 लिंक आणि...तेजस्वी सातपुतेंनी पहिल्यांदाच सांगितलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अशोक खरात प्रकरणात एसआयटीच्या हाती काय काय धागेदोरे लागले आहेत? याची माहिती आज एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यासोबत तेजस्वी सातपुते यांनी एक विशेष टीम म्हणजेच स्पेशल 4 टीम या प्रकरणात काम करते आहे.
Ashok Kharat Case, SIT Press Conference : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.त्यात आज अशोक खरात प्रकरणात एसआयटीच्या हाती काय काय धागेदोरे लागले आहेत? याची माहिती आज एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यासोबत तेजस्वी सातपुते यांनी एक विशेष टीम म्हणजेच स्पेशल 4 टीम या प्रकरणात काम करते आहे.त्यासोबत ही टीम कशी तपास करते आहे?याची देखील माहिती दिली आहे.
अशोक खरात प्रकरणात पहिला गुन्हा हा 20 मार्च 2026 ला दाखल झाला होता.या तारखेपासुन त्याच्यावर पुढे आणखी 10 गुन्हे दाखल झाले. अशोक खरात विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्ह्यात मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत. ज्यामध्ये अशोक खरात आरोपी आहे. तर 12 गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास हा एसआयटी करत आहे, तर दोन गुन्ह्यांपैकी एकाचा अहिल्यानगर पोलीस तर दुसऱ्याचा नाशिक शहर पोलीस करत असल्याची माहिती तेजस्वी सातपुते यांनी केली आहे.
advertisement
अशोक खरात विरुद्ध नसलेले मात्र या विषयाशी संबंधित असे दोन गुन्हे दाखल आहेत. त्या दोन गुन्ह्यांचा देखील तपास एसआयटी करत आहे. त्यामुळे 9 गुन्हे अशोक खरातच्या विरोधातले आणि विरोधात नसलेले पण संबंधित असलेले दोन गुन्हे असे एकूण 11 गुन्हे आमच्याकडे तपासाला आहेत, असे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले आहे.
अशोक खरात विरूद्ध 8 गुन्हे महिला लैंगिक अत्याचाराचे आहेत, तर उर्वरित तीन गुन्हे हे फसवणूक आणि त्याच्यासोबतच अंधश्रद्धा विरोधी कायदा अंधश्रद्धा विरोधी कायदा सावकारी अधिनियम 2014 आणि इकॉनॉमिक ऑफेन्स याप्रमाणे दाखल असल्याची माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.
advertisement
स्पेशल 4 चा हायटेक तपास
अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी 24 जणांची टीम आहे.या 24 पैकी 4 जणांची एक वेगळी टीम बनवण्यात आली आहे. कारण अशोक खरात प्रकरणात सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होत. काही लोकांनी हे व्हिडिओ शेअर करण्यासाठी सोशल मीडियावर नवीन अकाऊंट देखील बनवली आहेत.अशा सगळ्या व्हिडिओ शेअर करणाऱ्या अकाऊंटवर कारवाई करण्यासाठी ही स्पेशल 4 टीम बनवली आहे.
advertisement
या टीमने आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या 4650 लिक्स डिलिट केल्या आहेत. या टीमचं सूपर्ण लक्ष्य हे सोशल मीडियावर आहे. प्रत्येक काही मिनिटांनी कुठला व्हिडिओ शेअर किंवा अपलोड झाला आहे का? ते शोधून काढून त्याला रिपोर्ट करणे. त्यामुळे अशाप्रकारे एसआयटीची सायबर टीमने महाराष्ट्र सायबरच्या मदतीने आतापर्यंत 4650 लिंक्स डिलीट केल्या आहेत, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.
Location :
Nashik [Nasik],Nashik,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 6:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case : खरातचा कांड बाहेर काढणारी स्पेशल 4 टीम, 4650 लिंक आणि...तेजस्वी सातपुतेंनी पहिल्यांदाच सांगितलं









