Gold : 18K की 22K? दैनंदिन वापरासाठी कोणतं सोनं सर्वात योग्य? तज्ज्ञ काय सांगतात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बऱ्याचदा आपण फक्त किमतीचा विचार करतो, पण सोन्याची मजबुती आणि टिकाऊपणा हा त्यातील कॅरेटवर अवलंबून असतो. चला तर मग, आज सोन्याच्या या कॅरेटचं गुपित उलगडून पाहूया, जेणेकरून पुढच्या वेळी दागिने घेताना तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकाल.
लग्नाचा समारंभ असो, सण-उत्सव असो किंवा एखाद्याला खास भेट द्यायची असो, भारतीय घरांमध्ये सोनं खरेदी करण्याला एक वेगळंच महत्त्व आहे. आपण जेव्हा सराफाच्या दुकानात जातो, तेव्हा दागिने पाहताना आपली नजर त्यांच्या चमकण्यावर आणि डिझाइनवर खिळलेली असते. पण खरेदी करताना जेव्हा दुकानदार आपल्याला "हे 18 कॅरेट आहे" किंवा "हे 22 कॅरेट आहे" असं सांगतो, तेव्हा आपल्या मनात संभ्रमाची पाल चुकचुकते. नक्की या कॅरेटचा अर्थ काय? आणि समजा आपल्याला रोजच्या वापरासाठी एखादी अंगठी किंवा चेन घ्यायची असेल, तर कोणतं सोनं जास्त टिकेल? असा प्रश्न उपस्थीत होतो.
advertisement
advertisement
शुद्ध सोनं रोज का घालता येत नाही?सोनं हे त्याच्या नैसर्गिक स्वरूपात अत्यंत मऊ (Soft) धातू आहे. कल्पना करा, जर तुम्ही पूर्णपणे शुद्ध सोन्याची अंगठी रोज घातली, तर हाताच्या साध्या हालचालीने किंवा कुठे तरी घासली गेल्याने तिचा आकार बदलू शकतो किंवा त्यावर लगेच ओरखडे (Scratches) पडू शकतात. म्हणूनच, दागिने मजबूत करण्यासाठी सोन्यामध्ये तांबे, चांदी किंवा जस्त यांसारखे इतर धातू मिसळले जातात. या मिश्रणालाच आपण Alloy म्हणतो.
advertisement
advertisement
22 Karat (22K): यामध्ये 22 भाग सोनं आणि 2 भाग इतर धातू असतात. लग्नातील जड दागिन्यांसाठी हे सर्वात जास्त वापरलं जातं.18 Karat (18K): यामध्ये 75% शुद्ध सोनं आणि 25% इतर धातू असतात. हे सोनं दिसायला सुंदर आणि वापरायला अत्यंत मजबूत असतं.14 Karat (14K): यामध्ये सुमारे 58.3% शुद्ध सोनं असतं. हे अत्यंत टिकाऊ असतं, पण यात सोन्याचं प्रमाण कमी असतं.
advertisement
3. रोजच्या वापरासाठी 18 कॅरेटच का ठरतं 'बेस्ट'?जर तुम्ही ऑफिसला जाताना किंवा घरची कामं करताना रोज घालण्यासाठी दागिने शोधत असाल, तर 18 Karat (18K) हा एक संतुलित आणि उत्तम पर्याय आहे. याची काही खास कारणे.इतर धातूंचे मिश्रण 25% असल्याने हे सोनं कडक असतं. त्यामुळे रोजच्या धकाधकीतही दागिन्यांचा आकार बिघडत नाही.
advertisement
चमक आणि सौंदर्य: 18 कॅरेट सोन्याचा रंग 22 कॅरेटच्या तुलनेत थोडा फिकट असला, तरी तो दिसायला अत्यंत प्रीमियम आणि आधुनिक (Modern) वाटतो. हिऱ्याच्या दागिन्यांसाठी 18 कॅरेट हेच सर्वात जास्त वापरले जाते, कारण ते हिऱ्यांना घट्ट पकडून ठेवू शकते. हे दागिने लवकर काळे पडत नाहीत आणि त्यांची चमक वर्षानुवर्षे टिकून राहते.
advertisement
निवड कशी करावी?तुमची निवड ही तुमचं बजेट, जीवनशैली आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे दागिने आवडतात यावर अवलंबून असते. जर तुम्हाला गुंतवणुकीच्या दृष्टीने जड दागिने हवे असतील, तर 22 कॅरेट निवडा. पण जर तुम्हाला 'डेली वेअर'साठी स्टायलिश आणि मजबूत दागिने हवे असतील, तर 18 कॅरेट हा तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय आहे.
advertisement








