Electricity : रात्रभर बल्ब चालू राहिला तर किती बिल येतं? 9 वॉटच्या LED बल्बचं 'हे' गणित ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
- Published by:Devika Shinde
Last Updated:
LED बल्बमुळे वीज वाचते हे आपल्याला माहीत आहे, लोकांना आपण हे बोलताना देखील ऐकलं आहे, पण नक्की किती? समजा, तुमच्या घरातील एखादा 9 वॉटचा LED बल्ब चुकून 24 तास चालू राहिला, तर तुमच्या खिशाला किती कात्री लागेल?
रात्री झोपताना घरातील एखादा दिवा चुकून चालू राहिला की, सकाळी उठल्यावर आपल्याला सर्वात आधी कोणाची आठवण येते? अर्थातच, महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अव्वाच्या सव्वा वीज बिलाची. लाईट बंद करा, उगीच बिल येईल, हे वाक्य भारतीय घरांमध्ये अगदी रोजच ऐकायला मिळतं. पूर्वीच्या काळी पिवळे बल्ब असायचे, जे प्रचंड वीज खायचे आणि गरमही व्हायचं. पण आता काळ बदलला आहे आणि आपल्या घराघरात पांढऱ्याशुभ्र प्रकाशाचे LED बल्ब आले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
9 वॉटचा बल्ब आणि विजेचा हिशोबवीज बिल हे नेहमी युनिट मध्ये मोजलं जातं. त्यामुळे हिशोब करण्यासाठी आपल्याला 'वॉट'चे रूपांतर 'किलोवॉट'मध्ये करावे लागते.गणित समजून घेऊया: 9 वॉट म्हणजे 0.009 किलोवॉट (kW).जर हा बल्ब सतत 24 तास चालू राहिला, तर तो किती वीज वापरेल?0.009 kW × 24 hours = 0.216 units.याचाच अर्थ, एक 9 वॉटचा LED बल्ब पूर्ण दिवसभर जळत राहिला, तरी तो साध्या एका युनिटचा चौथा भाग म्हणजेच फक्त 0.216 युनिट वीज खर्च करतो.
advertisement
दिवसाचा खर्च किती?आता हे युनिट्स पैशात रूपांतरित करूया. समजा, तुमच्या भागात विजेचा दर प्रति युनिट 8 रुपये आहे (काही ठिकाणी हा दर कमी-जास्त असू शकतो).एका दिवसाचा खर्च: 0.216 units × 8 rupees = approx 1.73 rupees.म्हणजेच, जर तुमचा बल्ब दिवस-रात्र अखंड सुरू राहिला, तरीही एका दिवसाचा खर्च 2 रुपयांपेक्षाही कमी येतो.
advertisement
महिन्याचं बिल किती येईल?आता समजा, हाच बल्ब पूर्ण महिनाभर (30 दिवस) चुकून बंद करायचा राहिला, तर बिल किती येईल?महिन्याचा खर्च: 1.73 rupees × 30 days ≈ 52 rupees.केवळ 50 ते 55 रुपयांमध्ये तुम्ही एक 9 वॉटचा बल्ब महिनाभर 24 तास पेटता ठेवू शकता. जुन्या 100 वॉटच्या बल्बच्या तुलनेत ही बचत 80-90% इतकी मोठी आहे.
advertisement
LED बल्ब का आहेत फायदेशीर?1. कमी वीज, जास्त प्रकाश: साध्या बल्बच्या तुलनेत हे खूपच कमी वीज वापरतात.2. दीर्घायुष्य: हे बल्ब लवकर खराब होत नाहीत, त्यामुळे वारंवार नवीन बल्ब घेण्याचा खर्च वाचतो.3. कमी उष्णता: हे बल्ब जास्त गरम होत नाहीत, ज्यामुळे घरातील तापमान वाढत नाही.4. पर्यावरणपूरक: कमी वीज वापरल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते.
advertisement
advertisement










