advertisement

कोण आहे BBM6 चा विनर? घराबाहेर पडताच सागर कारंडेने सांगितलं नाव, म्हणाला 'ट्रॉफीचा खरा मानकरी...'

Last Updated:
Bigg Boss Marathi 6: नुकतंच एका मुलाखतीत सागरला विचारण्यात आलं की, या सीझनची ट्रॉफी कोण उचलेल असं तुला वाटतं. यावर सागरने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलंय.
1/9
'बिग बॉस मराठी'चं सहावं सीझन त्याच्या अंतिम टप्प्यावर पोहोचलं असून उर्वरित स्पर्धकांमध्ये आता 'तिकीट टू फिनाले'साठी लढाई सुरू असल्याचं दिसतंय.

2/9
गेल्या आठवड्यात अभिनेता सागर कारंडे घराबाहेर पडला. विशेष म्हणजे, घरातून बाहेर पडताना सागरने कोणताही ड्रामा केला नाही किंवा डोळ्यात पाणी आणलं नाही, तर हसतमुखाने त्याने सर्वांना निरोप दिला.

3/9
तब्बल ८५ दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर, आता घराबाहेर आल्यावर सागरने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. इतकंच नाही, तर त्याने त्याच्या नजरेतील बिग बॉस मराठी ६ चा विनर कोण आहे, हेही सांगितलं आहे.

4/9
फॅमिली वीकनंतर सागरचा गेम खालावला होता. तो मनातून खचला होता. याबाबत त्याने रितेश भाऊंसमोरही आपली व्यथा बोलून दाखवली होती. कदाचित याच मानसिक ओढाताणीचा परिणाम त्याच्या खेळावर झाला असावा, असं त्याच्या चाहत्यांना वाटतंय.

5/9
नुकतंच एका मुलाखतीत सागरने त्याच्या एलिमिनेशनवरही भाष्य केलं. त्याने सांगितलं,
नुकतंच एका मुलाखतीत सागरने त्याच्या एलिमिनेशनवरही भाष्य केलं. त्याने सांगितलं, "सुरुवातीला माझा विश्वासच बसत नव्हता की मी बाहेर येतोय. पण प्रेक्षकांचा कौल शिरसावंद्य आहे. मी तिथे जसा वागलो, तो पूर्णपणे 'ओरिजिनल' सागर होता, याचं मला समाधान आहे."
advertisement
6/9
या मुलाखतीत सागरला विचारण्यात आलं की, या सीझनची ट्रॉफी कोण उचलेल असं तुला वाटतं. यावर सागरने क्षणाचाही विलंब न लावता थेट अनुश्री मानेचं नाव घेतलं.

7/9
तो म्हणाला,
तो म्हणाला, "अनुश्रीचा खेळ खूप प्रामाणिक आणि समजदारीचा आहे. तिच्यातले गुण पाहता, तीच या सन्मानचिन्हाची खरी मानकरी आहे."
advertisement
8/9
इतकंच नाही, तर सागरने त्याचा मित्र आणि चला हवा येऊद्यामधून घराघरात पोहोचलेले भारत गणेशपुरे यांना या शोमध्ये स्पर्धक म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

9/9
याबद्दल सागर म्हणाला,
याबद्दल सागर म्हणाला, "भारत कमाल माणूस आहे. त्याचा विनोदी चेहरा सगळ्यांना माहित आहे, पण तो एक उत्तम 'एंटरटेनर' आणि कणखर माणूस आहे. त्याने विदर्भाचं प्रतिनिधित्व करत या घरात यावं, प्रेक्षकांना त्याला पाहायला नक्कीच आवडेल."
advertisement
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement