गोव्याच्या रस्त्यावर 'रिच किड'चा सैतानी वेग, दुचाकीला धडक, 50 फूट लांब फेकली; कामावरून घरी येणाऱ्या दीक्षाचा करुण अंत
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
गोव्यात मिनी कूपर कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला तर तिचा सहकारी गंभीर जखमी झाला.
पणजी : गोव्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून तिच्या सहकाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. मिनी कूपर कन्व्हर्टिबल कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या प्रकरणात कार चालवणारा 21 वर्षीय दारियस डायस याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दीक्षा परबवाडकर आणि डी. अरुणकुमार हे दोघेही गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करत होते. रविवारी रात्री ते दोघे दुचाकीवरून घरी परतत असताना बंबोलीम-डोना पाउला मार्गावर मणिपाल रुग्णालयाजवळ मिनी कूपर कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली, असे पोलिसांनी सांगितले.
धडकेचा जोर इतका होता की दोघेही दुचाकीवरून दूर फेकले गेले. काही रिपोर्टनुसार दुचाकी अपघाताच्या ठिकाणापासून सुमारे 50 मीटरपर्यंत फेकली गेली होती. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दीक्षा परबवाडकर यांचा मृत्यू झाला. तर अरुणकुमार यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
advertisement
अपघाताच्या वेळी कार चालवत असलेला दारियस डायस हा स्थानिक व्यावसायिक अँड्र्यू डायस यांचा मुलगा आहे. त्यांचा गोव्यात बेकरी आणि हॉटेल व्यवसाय आहे. संबंधित मिनी कूपर कारवर तात्पुरता नंबर प्लेट होता, म्हणजेच त्या वाहनाची अद्याप गोव्यात नोंदणी झालेली नव्हती. काही अहवालांनुसार ही कार नुकतीच खरेदी करण्यात आली होती आणि नव्या गाड्यांवर लावले जाणारे रिबनही कारवर दिसत होते.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 106 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. जे निष्काळजीपणामुळे मृत्यू होण्यास कारणीभूत ठरण्याशी संबंधित आहे.
दरम्यान गोव्यातील ‘O Heraldo’ या वृत्तपत्रानुसार मृत दीक्षाच्या कुटुंबीयांनी तपासात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पोलिसांवर तपासाबाबत पूर्ण अंधार ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे.
विशेष म्हणजे याआधी दोन महिन्यांपूर्वीच उत्तर गोव्यात अशाच एका भीषण अपघातात 65 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला होता. भगतराम शर्मा हे आपल्या कुटुंबासोबत सुट्टीसाठी गोव्यात आले होते. त्यांच्या कारला दिल्लीतील 19 वर्षीय शारुया गोयल हिने चालवलेल्या महिंद्रा थारने धडक दिल्याने हा अपघात झाला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 4:29 PM IST
मराठी बातम्या/देश/
गोव्याच्या रस्त्यावर 'रिच किड'चा सैतानी वेग, दुचाकीला धडक, 50 फूट लांब फेकली; कामावरून घरी येणाऱ्या दीक्षाचा करुण अंत









