advertisement

इस्तंबूल हादरलं! इस्रायली दूतावासाबाहेर बेछूट गोळीबार; तिघांचा जागीच मृत्यू, हाय-सिक्युरिटी झोनमध्ये घुसून हल्ला

Last Updated:

इस्तंबूलमध्ये इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाजवळ झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन पोलिस जखमी झाले. उच्च सुरक्षा असलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून तपास सुरू आहे.

News18
News18
इस्तंबूल: इस्तंबूलमध्ये इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाजवळ गोळीबाराची घटना घडली असून त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी घडल्याचे रॉयटर्सने वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा गोळीबार इस्रायली वाणिज्य दूतावास असलेल्या इमारतीजवळ झाला. हा परिसर अतिशय संवेदनशील आणि उच्च सुरक्षा व्यवस्थेखाली असतो. येथे नेहमीच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असतो कारण हा भाग राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी पोलिस अधिकाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागील कारण आणि हल्लेखोरांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तपास सुरू आहे.
advertisement
advertisement
सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसर बंद करून तपास वाढवला असून या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त दिसून येतोय. तसेच घटनेनंतर सुरक्षा दलांकडून परिसरात गस्त घालण्यात येत होती. संबंधित ठिकाणी इस्रायली दूतावास (मिशन) असल्यामुळे हा भाग नेहमीच कडक सुरक्षा व्यवस्थेखाली असतो.
घटनास्थळी तीन संशयितांना ठार करण्यात आले आहे. तुर्की माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हे संशयित रायफल्ससह सशस्त्र होते. त्यांनी कॅमोफ्लाज कपडे घातले होते आणि त्यांच्या पाठीवर बॅग्स होत्या. हल्ल्याचे नेमके कारण काय होते किंवा यात आणखी कोणी सहभागी होते का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
advertisement
या प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने AFP ला सांगितले की, सध्या तुर्कीमध्ये कोणताही इस्रायली राजनैतिक अधिकारी उपस्थित नाही. तसेच अधिकाऱ्यांनी दूतावासातील कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाल्याची माहिती दिलेली नाही.
तपास सुरू : तुर्कीचे न्यायमंत्री
तुर्कीचे न्यायमंत्री अकिन गुर्लेक यांनी सांगितले की जिल्ह्यातील वाणिज्य दूतावासाजवळ गोळीबाराच्या बातम्या आल्यानंतर तत्काळ तपास सुरू करण्यात आला आहे. सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली असून घटनास्थळी तपास सुरू आहे. तसेच कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या समन्वयाने हा तपास अत्यंत काळजीपूर्वक केला जात आहे.
advertisement
आमच्या मुख्य सरकारी वकिलांच्या कार्यालयाच्या समन्वयाखाली आणि संबंधित कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या सहकार्याने, या घटनेचा संपूर्ण उलगडा करण्यासाठी काम सुरू आहे. तपास अत्यंत बारकाईने आणि विविध अंगांनी केला जात आहे, असे गुरलेक यांनी X वर म्हटले.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
इस्तंबूल हादरलं! इस्रायली दूतावासाबाहेर बेछूट गोळीबार; तिघांचा जागीच मृत्यू, हाय-सिक्युरिटी झोनमध्ये घुसून हल्ला
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement