advertisement

तुमचा एसी 24° वरही जास्त कूलिंग देत नाहीये? टेन्शन कसलं घेताय, या ट्रिक्सने खोली होईल गारेगार

Last Updated:

उन्हाळ्यात एसीची प्रचंड गरज असते. मात्र एसी चालू करुनही रुम गार होत नसेल तर मग प्रॉब्लम होतो. पण एसी 24 डिग्रीवर सेट करुनही रुम गार करत नसेल तर यामागे काही कारणं असू शकतात. आज आपण याविषयी जाणून घेऊया.

एसी प्रॉब्लम
एसी प्रॉब्लम
मुंबई: देशातील अनेक भागांमध्ये तीव्र उन्हाळा सुरू झाला आहे. दुपारच्या वेळी तर ऊन असह्य होतं. अशावेळी जाऊन एसी लावून आराम करावा असं वाटतं. पण घरातील एसी 24 डिग्रीवर सेट करुनही रुम गारेगार करत नसेल तर काय? चला जाणून घेऊया एसीचा हा प्रॉब्लम का होतो आणि तो कसा दूर करावा. आधी जाणून घेऊया की एसी रुम गारेगार न करण्याची कारण...
फिल्टर आणि कॉइल खराब असणे 
एसीचं फिल्टर आणि एसीच्या आतील कॉइल खराब असेल आणि त्यात धूळ-माती जमा झालेली असेल. तेव्हा फिल्टर ब्लॉक होतं आणि गार हवा आत येऊ शकत नाही. एसी फक्त हवा फेकत राहतो पण रुम गारच होत नाही.
गॅस (रेप्रिजरेंट) कमी होणे 
एसीमध्ये गॅस लिक जालं असेल किंवा कमी झालं असेल तर एसी रुम गार करू शकत नाही. 24 डिग्रीवरही खोली गार होत नाही. ही समस्या जुन्या एसीमध्ये जास्त निर्माण होते.
advertisement
खोलीच्या साइजपेक्षा लहान एसी 
तुमची खोली मोठी असेल एसी कमी टनचा असेल (म्हणजे 1 टन एसी AC 120-150 sq ft खलीसाठी असतो. ) तर त्यामुळे पूर्ण खोली गार होऊ शकत नाही.
खोलीत उष्णता शिरते 
advertisement
खिडक्या-दरवाजे खुले राहणे, पडदे न लावणे, छतावर थेट ऊन येत असेल किंवा खोलीमध्ये चांगली इंसुलेशन नसणे. बाहेरची उष्ण हवा आत येत असेल तर एसी रुम गार करू शकत नाही.
फॅन स्पीड आणि मोड चुकीचा असणे 
अनेकदा लोक 'फॅन मोड' वर चालवतात किंवा फॅनची स्पीड खुप जास्त ठेवतात. यामुळे गारवा कमी येतो.
advertisement
एसीचा आउटडोर यूनिट उष्ण ठिकाणी असतो
आउटडोर यूनिट थेट उन्हात असेल किंवा बंद जागेवर असेल तर एसी नीट काम करत नाही.
समस्या कशी दूर करावी?
  • प्रत्येक 15-20 दिवसात एसीचं फिल्टर स्वच्छ करा.
  • वर्षात एकदा प्रोफेशनल सर्व्हिसिंग अश्य करुन घ्या.
  • खोलीच्या खिडक्यांवर जाड पडदे लावा आणि संध्याकाळी खिडक्या बंद ठेवा.
  • AC ला ‘Cool Mode’ वर 24°C वर ठेवा आणि फॅन स्पीड ‘Auto’ किंवा Medium वर ठेवा.
  • गॅस कमी लागत असेल तर लगेच टेक्निशियनला बोलवा.
  • खोलीची साइज पाहून योग्य क्षमतेचा एसी वापरा.
advertisement
AC 24 डिग्रीवर चालतोय आणि तरीही खोली गार होत नसेलतर मोठी समस्या नाही. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये घाण, गॅसची कमतरता किंवा खोलीत उष्णता आल्याने ही समस्या निर्माण होते. तुम्ही एसीची नियमित स्वच्छता केली, सर्व्हिसिंग केली आणि खोलीला उष्णतेपासून दूर ठेवलं तर एसी चांगला गारवा देईल आणि वीज बिलही कमी येईल.
advertisement
उन्हाळ्यात एसीच्या गार हवेचा आनंद घेत असताना एसीची योग्य देखभालही गरजेची आहे. वर सांगितलेले उपाय करुनही एसी कूलिंग देत नसेल तर चांगल्या टेक्निशियनला बोलवून चेक करुन घ्या.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
तुमचा एसी 24° वरही जास्त कूलिंग देत नाहीये? टेन्शन कसलं घेताय, या ट्रिक्सने खोली होईल गारेगार
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement