advertisement

कूलरचा खुपच आवाज येतोय का? या ट्रिकने पैसे खर्च न करता प्रॉब्लम होईल दूर 

Last Updated:

उन्हाळा सुरू झाला की घराघरात कूलर लावले जातात. पण अनेकदा या कूलरचा आवाज खुपच त्रासदायक वाटतो. हाच खटखट आवाज तुम्ही अगदी काही मिनिटांत दूर करू शकता.

कूलर नॉइस प्रॉब्लम
कूलर नॉइस प्रॉब्लम
मुंबई : उन्हाळा सुरू झाला की, कूलरची खुपच गरज पडते. कूलर हे स्वस्तात मिळतात आणि परवडणारे असल्याने सर्वसामान्य घरांमध्ये उन्हाळ्यात याचा जास्त वापर केला जातो. पण अनेकदा अचानक कूलरमधून खटखट, किंवा खुपच त्रासदायक आवाज येतो. ज्यामुळे नीट झोपही लागत नाही. अनेक लोकांना वाटतं की, कूलर खराब झाला. पण हा आवाज काही किरकोळ कारणांमुळे येत असतो. चला जाणून घेऊया हा आवाज का येतो आणि तो कसा दूर केला जाऊ शकतो.
पहिलं कारण म्हणेज पाण्याची लेव्हल चुकीची असल्याने असा आवाज येतो. कूलरमध्ये पाणी खुप कमी असेल तर पंप हवा ओढतो. यामुळे पाणी आणि हवेचं मिश्रण तयार होतं. जे पाईपमध्ये बुडबुडे तयार करतं आणि गडगड आवाज येतो. तसंच पाणी जास्त भरलं तरीही ओव्हरफ्लोमुळे पाणी पंपातून खाली येण्याचा आवाज येतो.
पंपात हवा जाणे 
advertisement
कूलरचं पंप पाण्याला वरच्या ट्रेमध्ये घेऊन जातो. पंपात हवा गेली तर पाणी योग्य प्रकारे जात नाही. हवेचे बुडबुडे पाइपमध्ये फिरतात आणि गडगड आवाज येतो. कूलर दीर्घकाळापासून बंद पडलं असेल किंवा पाणी बदलताना पंपात हवा गेली तर असा आवाज येतो.
advertisement
पाइप आणि नोजरमध्ये घाण किंवा ब्लॉकेज 
उन्हाळ्यात धूळ-माती किंवा पाण्यातील खनिज जमा होतात. यामुळे लहान-लहान छिद्र ब्लॉक होतात. पाणी जोरात या छिद्रांमध्ये जातं तेव्हा असामान्य प्रवाहामुळे गडगड आवाज येतो.
फॅनच्या वेगवान हवेचा परिणाम 
कूलरचा फॅन वेगाने चालतो तेव्हा कधी-कधी हवा पाण्यावर दबाव टाकते. ज्यामुळे पाण्यात हालचाल होते आणि पाइपमध्ये बुडबुडे जमा होतात.
advertisement
जुना किंवा खराब पंप 
कूलर अनेक वर्षे जुना असेल तर पंप कमकुवत होतं. ते नीट पाणी ओढू शकत नाही आणि आवाज करते.
हा प्रॉब्लम कसा दूर करावा?
  • सर्वात आधी कूलरचं पाणी पूर्णपणे काढून घ्या आणि टँक स्वच्छ करा.
  • स्वच्छ पाणी भरा आणि लेव्हल योग्य ठेवा. (सामान्यतः अर्ध्यापेक्षा जास्त भरू नका.)
  • पंप चेक करा. तो खाली वर हलवून त्यातील हवा बाहेर काढा.
  • नोजल आणि पाण्याचा पाइप स्वच्छ करा. ब्लॉक असेल तर सुई किंवा ब्रशने स्वच्छ करा.
  • प्रत्येक 15-20 दिवसात पाणी बदलत राहा आणि कूलर झाकून ठेवा. जेणेकरुन धूळ आत जाणार नाही.
advertisement
मॅकेनिकला कधी बोलवावं?
आपण वर पाहिलेले उपाय केल्यानंतरही आवाज थांबत नसेल, पंपातुन जळण्याचा आवाज किंवा पाणी अजिबात येत नसेल तर प्रोफेशनल सर्व्हिसमेनला बोलवू शकता. पंप किंवा मोटर खराब झालेली असू शकते.
कूलरमधून येणारा गडगड आवाज हा जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये गंभीर समस्या नसते. लहान-मोठ्या दुर्लक्षांमुळे हा प्रॉब्लम येत असतो. तुम्ही नियमित कूलर स्वच्छ केलं, पाणी योग्य लेव्हलवर ठेवलं आणि वेळोवेळी सर्व्हिसिंग करत राहिलात तर कूलर कोणताही आवाज न करता हवा देत राहील.
advertisement
उन्हाळ्यात कूलरची योग्य काळजी घेतली तर कूलरमधून आवाजही येत नाही. यासोबत कूलरची लाइफही वाढते. पुढच्या वेळी कूलरमधून आवाज आल्यास घाबरू नका. वर सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करा.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
कूलरचा खुपच आवाज येतोय का? या ट्रिकने पैसे खर्च न करता प्रॉब्लम होईल दूर 
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement