Mhada Lottery : तुम्हाला ३०,००० रु पगार! म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येईल का? त्यासाठी पात्रता काय? A TO Z माहिती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Mhada Lottery Application : स्वतःचं घर असावं हे अनेकांचं स्वप्न असतं. आता हे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. म्हाडा च्या मुंबई मंडळाने घर विक्रीसाठी नवीन लॉटरी जाहीर केली असून, यामध्ये एकूण 2640 घरांचा समावेश आहे.
मुंबई : स्वतःचं घर असावं हे अनेकांचं स्वप्न असतं. आता हे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. म्हाडा च्या मुंबई मंडळाने घर विक्रीसाठी नवीन लॉटरी जाहीर केली असून, यामध्ये एकूण 2640 घरांचा समावेश आहे. ही घरे मुंबईतील विविध भागांत उपलब्ध आहेत. या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
कोणकोणत्या उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध?
या लॉटरीत सर्व प्रकारच्या उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG) मध्यम उत्पन्न गट (MIG),उच्च उत्पन्न गट (HIG) अर्जदार आपल्या उत्पन्नानुसार योग्य गट निवडून अर्ज करू शकतात.
उत्पन्न मर्यादा काय आहे?
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विचारात घेतले जाणार आहे. 'कौटुंबिक उत्पन्न' म्हणजे अर्जदार आणि त्यांचे पती/पत्नी यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न होय.
advertisement
उत्पन्नाचा पुरावा म्हणून आयकर विवरणपत्र (FY 2024-25 / AY 2025-26) किंवा तहसीलदारांचा उत्पन्न दाखला सादर करणे बंधनकारक आहे. इतर कोणतेही कागदपत्र ग्राह्य धरले जाणार नाहीत.
उत्पन्न गटानुसार मर्यादा (वार्षिक)
EWS - 6 लाखांपर्यंत
LIG - 9 लाखांपर्यंत
MIG - 12 लाखांपर्यंत
HIG - कोणतीही कमाल मर्यादा नाही
कोणत्या गटातून कोण अर्ज करू शकतो?
EWS गटातील व्यक्ती EWS आणि LIG साठी अर्ज करू शकतात.
advertisement
LIG गटातील व्यक्ती LIG आणि MIG साठी अर्ज करू शकतात.
MIG गटातील व्यक्ती MIG आणि HIG साठी अर्ज करू शकतात.
HIG गटातील व्यक्ती फक्त HIG साठी अर्ज करू शकतात.
अर्ज करताना काय काळजी घ्यायची?
जर पती-पत्नी दोघेही कमावते असतील, तर दोघांचेही उत्पन्न दाखवणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास किंवा उत्पन्न लपवल्यास अर्ज रद्द होऊ शकतो आणि भरलेली रक्कम जप्त केली जाऊ शकते.
advertisement
30,000 पगार असलेल्यांना संधी आहे का?
जर तुमचा मासिक पगार 30,000 असेल, तर वार्षिक उत्पन्न सुमारे 3.6 रु लाख होते.अशा परिस्थितीत, इतर उत्पन्नासह एकूण कौटुंबिक उत्पन्न 6 लाखांच्या आत असल्यास तुम्ही EWS गटातून अर्ज करू शकता. तसेच या गटातील व्यक्तींना LIG गटासाठीही अर्ज करता येतो.
अर्ज कसा करावा?
या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी म्हाडा मुंबई मंडळ च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. तसेच अधिकृत माहिती आणि जाहिरात पुस्तिका (बुकलेट) देखील वेबसाईटवर उपलब्ध आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 12:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mhada Lottery : तुम्हाला ३०,००० रु पगार! म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येईल का? त्यासाठी पात्रता काय? A TO Z माहिती









