RCB vs CSK : ड्रिंक्स ब्रेकमध्ये राडा! कॅप्टनने आक्षेप घेतला अन् दिनेश कार्तिकचा थेट अंपायरशी पंगा, कुणीच दाखवला नाही Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Dinesh Kartik Angry On Field Umpire : मैदानात रणनितीबाबत चर्चा सुरू असताना रजत पाटीदारने अंपायरकडे बोट दाखवत काहितरी सांगितलं. ज्यामुळे अँडी फ्लॉवर आणि दिनेश कार्तिक दोघंही भडकले.
RCB vs CSK drinks Break Controversy : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात झालेल्या मॅचमध्ये आरसीबीने दमदार विजय मिळवला अन् पाईंट्स टेबलच्या टॉपवर उडी घेतली आहे. आरसीबीने दोन्ही मॅचमध्ये मोठे विजय मिळवले आहेत. अशातच आता आरसीबीने चेन्नईचा देखील खात्मा केला. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने मागील सात मॅचपेकी एकही मॅच गमावली नाही. आरसीबीने आपली विजयाची गाडा या वर्षी देखील सुरूच ठेवला आहे. अशातच या मॅचमध्ये ड्रिंक्स ब्रेकमध्ये राडा झाल्याचं पहायला मिळालं. नेमकं काय घडलं? पाहा
मैदानात एक किस्सा घडला
चेन्नईविरुद्ध आरसीबीची बॅटिंग सुरू असताना कॅप्टन रजत पाटीदार आणि देवदत्त पेडिक्कल यांनी आक्रमक स्कोर उभा केला. 14 ओव्हरपर्यंत आरसीबीच्या 151 धावा झाल्या होत्या. रजत आणि पेडिक्कल दोघंची चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होते. त्याचवेळी ड्रिंक्स ब्रेक झाला. खेळाडूंसाठी पाणी आणि रणनिती घेऊन दिनेश कार्तिक मैदानात आला. त्यावेळी हेड कोच अँडी फ्लॉवर देखील सोबत होते. दोघांनी आक्रमण करायचं, अशी रणनिती डीकेने दोघांना सांगितली. त्यावेळी एक किस्सा मैदानात घडला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
advertisement
Dinesh Karthik brought drinks for Rajat Patidar & Devdutt Padikkal… umpire grabbed one
Patidar angrily: “Return it!”
Umpire Saw them coming back and quickly returned it
Karthik, Andy Flower & Patidar’s reactions was hilarious
pic.twitter.com/okFmeJO5gS
— CricketElysium (@ElysiumCricket) April 6, 2026
advertisement
दिनेश कार्तिक अंपायरवर भडकला
मैदानात रणनितीबाबत चर्चा सुरू असताना रजत पाटीदारने अंपायरकडे बोट दाखवत काहितरी सांगितलं. ज्यामुळे अँडी फ्लॉवर आणि दिनेश कार्तिक दोघंही भडकले. दोघांनी अंपायरला जाब विचारण्यासाठी पुढाकार घेतला अन् अंपायरसोबत काही वादावादी झाल्याचं समोर आलं. नेमकी चर्चा काय झाली होती? याची अद्याप माहिती समोर आली नाही. ब्रॉडकास्टिंगमध्ये जाहीरात सुरू असताना ही घटना घडली. त्यामुळे याचा व्हिडीओ समोर आला नाही. पण आता एका साऊथच्या चॅनेलमध्ये याची चित्रिकरण झालं.
advertisement
नेमकं काय भांडण झालं?
दरम्यान, अंपायरसोबत नेमकं काय भांडण झालं? याची माहिती समोर आली नसली तरी आरसीबीची प्लॅनिंग फेल गेली नाही. ड्रिंक्स ब्रेकनंतर पहिल्याच बॉलवर रजत पाटीदारची विकेट गेली अन् तडाखेबाज बॅटर टीम डेव्हिड मैदानात आला. त्यानंतर आरसीबीने फक्त 6 ओव्हरमध्ये 100 धावा केल्या अन् स्कोर 250 वर पोहोचवला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 11:54 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RCB vs CSK : ड्रिंक्स ब्रेकमध्ये राडा! कॅप्टनने आक्षेप घेतला अन् दिनेश कार्तिकचा थेट अंपायरशी पंगा, कुणीच दाखवला नाही Video








