उसने पैसे देताना दहावेळा विचार करा! पुण्यात पैसे परत मागताच समोरच्याची सटकली, पिस्तूल काढला अन्...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
नायडू यांनी आरोपींना काही पैसे हातउसने दिले होते. रविवारी नायडू हे आपल्या दोन भाच्यांसह शंकरशेठ रस्त्यावरील स्मशानकाली मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी आरोपी तिथे भेटले
पुणे: पुण्यात गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात शंकरशेठ रस्त्यावरील धोबी घाट परिसरात पैशांच्या व्यवहारातून वाद झाला. यानंतर एका व्यक्तीसह त्याच्या दोन भाच्यांवर पिस्तूल रोखून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोघांना अटक केली. तसंच या प्रकरणात एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी कानिफनाथ विष्णू नायडू (वय ५१, रा. भवानी पेठ) यांनी आरोपींना काही पैसे हातउसने दिले होते. रविवारी नायडू हे आपल्या दोन भाच्यांसह शंकरशेठ रस्त्यावरील स्मशानकाली मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणी आरोपींची भेट झाली. यावेळी नायडू यांनी आपले पैसे परत मागितले. याच कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
advertisement
'ती गॅलरीतून पडली'; मृत पत्नीला घेऊन रुग्णालयात पोहोचला पुण्यातील पती, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी नायडू यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे भाचे मध्यस्थी करायला आले असता, आरोपींनी त्यांच्यावरही पिस्तूल रोखले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात नायडू आणि त्यांचे दोन्ही भाचे जखमी झाले आहेत.
advertisement
घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नायडू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून दोन आरोपींना अटक केली आहे. फरार असलेल्या इतर चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून झालेल्या या हल्ल्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 12:11 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
उसने पैसे देताना दहावेळा विचार करा! पुण्यात पैसे परत मागताच समोरच्याची सटकली, पिस्तूल काढला अन्...









