advertisement

Mumbai News: अनेक तरूणांचं ‘परदेशी नोकरी’चं स्वप्न भंगंलं, मुंबईतून भामट्याला जेरबंद

Last Updated:

परदेशामध्ये नोकरी देण्याची अमिष दाखवणार्‍या भामट्याला मुंबईच्या सीबीआय टीमकडून जेरबंद करण्यात आले आहे. सध्या सीबीआय टीमकडून तरूणांना गंडवणाऱ्या सायबर गुन्हेगाराची कसून चौकशी सुरू आहे.

News18
News18
मुंबई: परदेशामध्ये नोकरी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण सध्या याच आवडीचा अनेक भामटे गैरफायदे घेताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. मुंबईमध्ये सीबीआयने नोकरीचे अमिष दाखवणाऱ्या भामट्याला जेरबंद केले आहे. परदेशामध्ये नोकरीला लावून देण्याच्या अमिषाने एका व्यक्तीने तरूणांना सायबर गुन्हेगारीला जुंपले आहे. सध्या या प्रकरणाची सर्वत्रच जोरदार चर्चा होत आहे. मुंबईच्या सीबीआय टीमने तरूणांना गंडवणाऱ्या सायबर गुन्हेगाराला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे.
परदेशामध्ये नोकरीचे आमिष दाखवत तरूणांना गंडा घालून त्यांना म्यानमारमध्ये सायबर गुन्हेगारीच्या कामामध्ये गुंतवलं जात होते. त्यांच्या हातात हे बेकायदेशीर काम दिले जात होते. नोकरीचे अमिष दाखवणाऱ्या भामट्याचं नाव, सुनील रामकृष्णन उर्फ क्रिश असे होते. क्रिशला मुंबईच्या सीबीआय ब्रँचने ताब्यामध्ये घेतलं आहे. थायलंडमध्ये नोकरी देण्याचे अमिष क्रिश दाखवायचा. गरजू तरुण त्याकडे नोकरीच्या अमिषाने आल्यानंतर त्यांना तो सर्वप्रथम दिल्लीमध्ये पाठवायचा. मग तो त्यानंतर त्यांना बँकॉक आणि नंतर म्यानमारमध्ये पाठवायचा. तिथे तो तरूणांना कॉल सेंटरमध्ये सायबर गुन्हेगारीच्या कामाला लावून द्यायचा.
advertisement
हे काम पाहून अनेक तरूण म्यानमार आणि त्यानंतर बँकॉक मार्गे पळून आले. त्यांनी भारतात येताच या संपूर्ण प्रकरणाची माहिती सीबीआयला दिली होती. या प्रकरणाच्या तपासाअंती भारतातून क्रिशची भूमिका महत्त्वाची असल्याची कळताच त्याला सीबीआयच्या अधिकार्‍यांनी मुंबईमधून अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण मुंबईमध्ये सुरू होते. सध्या सीबीआयच्या टीमकडून क्रिशने कोणकोणत्या परिसरातील तरूणांना परदेशात नोकरी देण्याचं अमिष देत फसवलं आहे, याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. सीबीआयच्या टीमकडूनच या प्रकरणाची सखोल आणि सर्वच स्तरातून चौकशी केली जात आहे. याचे धागेदोरे कुठपर्यंत जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: अनेक तरूणांचं ‘परदेशी नोकरी’चं स्वप्न भंगंलं, मुंबईतून भामट्याला जेरबंद
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement