advertisement

Ashok Kharat CDR : खरातचे कॉल डिटेल कुणी लीक केले? पहिल्यांदाच SIT ने समोर येत सगळंच सांगितलं

Last Updated:

अशोक खरातचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) बाहेर आल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. अखेर आज एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेत यावर खुलासा केला आहे.

News18
News18
मुंबई : नाशिक भोंदू खरात प्रकरणात रोज नवे मोठे खुलासे समोर येत आहे. खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान अशोक खरातचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) बाहेर आल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. या संदर्भात विरोधकांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला होता. खरात प्रकरणी नेमकी त्याच्यावर कारवाई सुरू आहे की कोणाला टार्गेट करण्यासाठी हे प्रकरण बाहेर काढण्यात आले आहे असा संशय निर्माण होत होता. अखेर आज 21 दिवसानंतर एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेत यावर खुलासा केला आहे.
अशोक खरात प्रकरणाशी संबंधितांचा ‘सीडीआर’ आपल्याकडे असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. परंतु, असा ‘सीडीआर’ प्राप्त करून घेण्याचा अधिकार तपास यंत्रणा वगळता कुणालाही नाही. सीडीआर जर अशा प्रकारे कोणाला मिळत असतील तर ते जाणीवपूर्वक देण्यात आले की काय? असा संशय निर्माण होतो. सरकारने या प्रकरणी खुलासा करावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. त्यानंतर आज एसआयटीच्या प्रमुखांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की शासन स्तरवार चौकशी होत आहे. चौकशीत जे समोर येईल ते आपल्यासमोर येईल,
advertisement

कुणाकुणाचे डिटेल आले होते समोर?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात 17 फोन कॉल्स झाल्याचा दावा केला होता. त्यांना हा CDR एका अनोळखी व्यक्तीकडून मिळाल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. यामध्ये रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांच्याशी मोबाईलद्वारे संभाषण झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
advertisement

अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत दाखल झालेले गुन्हे

  • 1 ते 8 गुन्हे लैंगिक शोषण, जादूटोणा नरबळी, धमकावणे या नुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • 9 आणि 10 वा गुन्हा आर्थिक फसवणूक सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल
  • एकूण नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 10 गुन्हे दाखल
  • तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि राहता पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे 2 गुन्हे दाखल
  • असे एकूण खरातवर 12 गुन्हे दाखल आहे, त्यात 8 लैंगिक शोषण आणि 4 आर्थिक फसवणुकीचे आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat CDR : खरातचे कॉल डिटेल कुणी लीक केले? पहिल्यांदाच SIT ने समोर येत सगळंच सांगितलं
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement