advertisement

IPL 2026 : श्रेयस अय्यरच्या बहिणीने चुकता केला जुना हिशोब... मॅच रद्द झाल्यावर KKR ला डिवचलं!

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये केकेआर आणि पंजाब यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला. कोलकात्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे अंपायरनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

श्रेयस अय्यरच्या बहिणीने चुकता केला जुना हिशोब... मॅच रद्द झाल्यावर KKR ला डिवचलं!
श्रेयस अय्यरच्या बहिणीने चुकता केला जुना हिशोब... मॅच रद्द झाल्यावर KKR ला डिवचलं!
कोलकाता : आयपीएल 2026 मध्ये केकेआर आणि पंजाब यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला. कोलकात्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे अंपायरनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला, यानंतर दोन्ही टीमना एक-एक पॉईंट दिला गेला. याचसोबत पंजाब किंग्सची टीम पॉईंट्स टेबलमध्ये 5 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. दुसरीकडे केकेआरला या मोसमातला पहिला पॉईंट मिळाला, याआधी केकेआरचा पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झाला होता.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर 3.4 ओव्हरमध्ये केकेआरने 2 विकेट गमावून 25 रन केल्या होत्या, पण तेव्हाच पावसाला सुरूवात झाली. केकेआरला अडचणीत आणल्यानंतर पावसाला सुरूवात झाल्यामुळे पंजाबला मात्र हातात असलेला आणखी एक पॉईंट गमावल्याचं दु:ख झालं असेल. हा सामना जिंकला असता तर पंजाबचे 6 पॉईंट्स झाले असते.
advertisement
केकेआर आणि पंजाब किंग्स यांच्यातला सामना रद्द झाल्यानंतर श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठा अय्यरने एक व्हिडिओ बनवला आहे, ज्यात तिने केकेआरवर निशाणा साधला आहे.



 










View this post on Instagram























 

A post shared by Shresta Iyer (@shrestaiyer29)



advertisement

श्रेयसच्या बहिणीने चुकता केला जुना हिशोब?

केकेआरने 2024 साली आपली तिसरी आणि शेवटची आयपीएल ट्रॉफी जिंकली, तेव्हा श्रेयस अय्यर केकेआरचा कर्णधार होता. पण पुढच्याच मोसमात केकेआरने श्रेयस अय्यरला रिलीज केलं, ज्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. 2025 मध्ये श्रेयस अय्यर पंजाब किंग्सच्या टीममध्ये आला आणि त्यांचा कर्णधार झाला. यानंतर त्याने आपल्या पहिल्याच मोसमात पंजाबला आयपीएल 2025 च्या फायनलमध्येही पोहोचवलं. यंदाच्या मोसमातही पंजाबची टीम उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
advertisement

श्रेष्ठा अय्यरने केकेआरला डिवचलं

सोमवारी कोलकात्यामध्ये पाऊस पडल्यामुळे केकेआर आणि पंजाब यांच्यातला सामना रद्द झाला, त्यानंतर श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठा अय्यरने एक व्हिडिओ शेअर केला. 'पंजाबींचं मन खूप मोठं असतं, जा देऊन टाकला एक पॉईंट', असं श्रेष्ठा अय्यर या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे.
श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठा अय्यर हिचे इन्स्टाग्रामवर 3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. दिग्गज भारतीय क्रिकेटपटूची बहिण असल्यामुळे ती चर्चेतही असते. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारी श्रेष्ठा डान्सचे व्हिडिओही शेअर करते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : श्रेयस अय्यरच्या बहिणीने चुकता केला जुना हिशोब... मॅच रद्द झाल्यावर KKR ला डिवचलं!
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement