advertisement

Beauty Tips : पिंपल्स आणि चेहऱ्यावरील डागांचं टेंशनच सोडा, 'या' सोप्या उपायांनी सहज उजळेल त्वचा..

Last Updated:
Skin care home remedy in marathi : संत्र्याप्रमाणेच त्याच्या सालीतही अनेक औषधी गुणधर्म असतात. संत्री हे रसाळ आणि चवदार असण्यासोबत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. तसेच त्याची साल ही त्वचेसाठी वरदान ठरू शकते. ब्यूटी एक्सप्पर्टच्या मते, संत्र्याची साल व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते. या सालीच्या त्वचेवर योग्य प्रकारे वापर केल्यास चेहऱ्या उजळून निघू शकतो. संत्र्याची साल एवढी फायदेशीर असते की हा लेख वाचल्यानंतर तुम्ही ती कचऱ्यात फेकून देण्याआधी नक्कीच विचार कराल...
1/9
संत्री हे आरोग्यासाठी अनेकप्रकारे फायदेशीर ठरणारं फळ आहे. रसाळ संत्री चवदार असण्यासोबतच सौंदर्यासाठी देखील अतिशय उपयुक्त असते. संत्र्याची साल व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते. या सालीचा योग्यप्रकारे वापर केल्यास चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग दूर होऊ शकतात. महागड्या सौंदर्य उत्पादनांपेक्षा संत्र्याची साल अतिशय प्रभावी ठरते. तुमची त्वचा तेलकट असो किंवा टॅन झालेली असो संत्र्याच्या सालीचा योग्य वापर केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येऊ शकते.

2/9
संत्र्याच्या सालीचा चेहऱ्यावर वापर करण्यासाठी त्याची पावडर बनवून ठेवा. ब्यूटी एक्सप्पर्ट किरण पांडे यांनी सांगितले की, संत्र्याच्या सालीची पावडर बनवणे खूप सोपे आहे. संत्री खाल्ल्यानंतर त्याच्या सालीवरील कीटकनाशकं किंवा घाण काढून टाकण्यासाठी साल स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवा. नंतर 2 ते 3 दिवस कडक उन्हात वाळवा. साल पूर्णपणे वाळल्यानंतर आणि कडक झाल्यावर ती मिक्सरमध्ये स्वच्छ भांड्यातून फिरवून घ्या आणि बारीक पावडर बनवून घ्या. ही पावडर स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवा. योग्य पद्धतीने साठवल्यास ती अनेक महिने खराब होत नाही.

3/9
सामान्य त्वचा असलेल्यांसाठी म्हणजे ज्यांची त्वचा खूप तेलकट किंवा खूप कोरडी नाशी अशा लोकांसाठी संत्र्याच्या सालीची पावडर खूप फायदेशीर ठरते. संत्र्याच्या पावडरचा वापर करण्यासाठी एक चमचा पावडर घ्या आणि गुलाब जलमध्ये मिसळून जाड पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर हळूवारपणे लावा. 10 ते 15 मिनिटे सुकू द्या. नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा नियमितपणे वापरल्याने तुमचा चेहरा उजळू लागेल आणि हळूहळू मुरुम कमी होतील.

4/9
खूप तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी एक चमचा पावडर थोडे दही किंवा मधात मिसळून पेस्ट तयार करा. दही त्वचेला थंड करते आणि मध बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करते. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटं तशीच ठेवा. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. ही पेस्ट चेहऱ्यावरील तेल शोषून घेते आणि मुरुम पुन्हा येण्याची शक्यता कमी करते.

5/9
तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग किंवा टॅनिंग असेल तर संत्र्याच्या पावडरमध्ये चिमूटभर हळद मिसळा आणि त्याचा चेहऱ्यावर वापर करा. ​​हळदीचे नैसर्गिक गुणधर्म तुमची त्वचा स्वच्छ करतात आणि उजळवतात. आठवड्यातून 1 ते 2 दिवस हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावल्याने डाग हळूहळू हलके होतील.

6/9
त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण हे चेहऱ्यावरील मुरुमांचे एक कारण असते. संत्र्याच्या सालीची पावडर छिद्रांना खोलवर स्वच्छ करते. फेस पॅक म्हणून लावल्यास ती मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचामोकला श्वास घेऊ लागते आणि नवीन मुरुमे तयार होण्याची शक्यता कमी होते. याचा नियमित वापर केल्यास त्वचा गुळगुळीत आणि स्वच्छ होते.

7/9
संत्र्याच्या सालीची पावडर हा एक स्वस्त आणि सोपा उपाय आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम आणि फेस वॉशच्या तुलनेत ही पावडर अतिशय स्वस्त आणि प्रभावी आहे. तसेच एकदा तयार केल्यानंतर ती बराच काळ वापरता येते. तरुण आणि महिलांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

8/9
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ताजी, रसाळ संत्री खाल तेव्हा त्याच साल कचऱ्यात फेकण्याऐवजी उन्हात वाळवून तिची पावडर बनवा आणि चेहऱ्यावर लावला थोड्या प्रयत्नाने तयार केलेली ही पावडर तुमच्या त्वचेच्या अनेक समस्यांवर उपाय ठरू शकते.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.

दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement