Weather Alert: महाराष्ट्रावर पुन्हा संकट, येणार उष्णतेची लाट, हवामान खात्याचा अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
कालच्या तुलनेत कमाल तापमानात सुमारे 1 अंशांची वाढ नोंदवली जाईल. राज्यभरात आता शिमगा आधीच कडाक्याच्या उन्हाने सुरुवात केली आहे . तसंच हवामान विभागाने आज पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात येईल.
18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण हवामान राहील. राज्यातील बहुतांश भागांत आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील. सकाळच्या वेळी काही भागांत हलका गारवा जाणवेल, मात्र दुपारच्या वेळेत तापमानात वाढ होईल. कालच्या तुलनेत कमाल तापमानात सुमारे 1 अंशांची वाढ नोंदवली जाईल. राज्यभरात आता शिमगा आधीच कडाक्याच्या उन्हाने सुरुवात केली आहे . तसंच हवामान विभागाने आज पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात येईल.
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात दिवसाची सुरुवात तुलनेने सौम्य गारव्याने होईल. पहाटे आणि सकाळच्या वेळेत किमान तापमान 18 ते 20 अंशांच्या दरम्यान राहील. मात्र सकाळ पुढे सरकताच सूर्यप्रकाश तीव्र होईल आणि दुपारी कमाल तापमान 36 ते 37 अंशांपर्यंत पोहोचेल. दुपारच्या वेळेत उकाडा स्पष्टपणे जाणवेल आणि खुल्या भागांत तापमान अधिक जाणवेल. ग्रामीण भागात शेतीकाम करणाऱ्यांना दुपारी उष्णतेचा त्रास होऊ शकतो. संध्याकाळनंतर तापमानात हळूहळू घट होईल आणि रात्री पुन्हा हलका गारवा जाणवेल; मात्र दिवसातील उष्णता प्रकर्षाने जाणवेल.
advertisement
मराठवाडा आणि विदर्भात कोरडे व उष्ण हवामान कायम राहील. मराठवाड्यात कमाल तापमान 37 ते 38 अंशांपर्यंत जाईल आणि किमान तापमान 17 ते 19 अंशांच्या दरम्यान राहील. विदर्भात उष्णतेची तीव्रता अधिक राहील; काही भागांत कमाल तापमान 38 ते 39 अंशांपर्यंत नोंदवले जाईल, तर किमान तापमान 19 ते 21 अंशांच्या आसपास राहील. दुपारच्या वेळी कडक ऊन राहील.
advertisement









