advertisement

Rohit Sharma : 'मुंबईत राहतो मराठी तर येणारच...', हास्यजत्रेच्या कलाकारांसमोर रोहित शर्माने मन जिंकलं, Video

Last Updated:

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाच्या कलाकारांची भेट घेतली आहे.

'मुंबईत राहतो मराठी तर येणारच...', हास्यजत्रेच्या कलाकारांसमोर रोहित शर्माने मन जिंकलं, Video
'मुंबईत राहतो मराठी तर येणारच...', हास्यजत्रेच्या कलाकारांसमोर रोहित शर्माने मन जिंकलं, Video
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाच्या कलाकारांची भेट घेतली आहे. हास्यजत्रा मधील अभिनेत्री नम्रता संभेराव हिने रोहित शर्मासोबतच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. नम्रता संभेराव सोबत या व्हिडिओमध्ये प्रसाद खांडेकर आणि ओमकार राऊतही दिसत आहेत.
मुंबईमध्ये राहतो, मराठी तर येणारच, असं उत्तर रोहित शर्माने हास्यजत्राच्या कलाकारांना दिलं आहे. नम्रता संभेरावने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 'आम्ही तुमचे मराठीमध्ये बोलतानाचे व्हिडिओ बघतो', असं नम्रता संभेराव रोहित शर्माला म्हणाली, त्यावर मुंबईमध्ये राहतो, मराठी यायला पाहिजे, असं
भारत आणि श्रीलंकेमध्ये सध्या टी-20 वर्ल्ड कप सुरू आहे. रोहित शर्मा या वर्ल्ड कपचा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर आहे. रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यात कोलंबोमध्ये टी-20 वर्ल्ड कपचा सामना रंगला, या सामन्यासाठी रोहित कोलंबोला गेला होता. तिथून तो मुंबईमध्ये आला आणि त्यानंतर त्याने हास्यजत्रामधल्या कलाकारांची भेट घेतली.
advertisement
advertisement
रोहित शर्माने टेस्ट आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळत आहे. जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या वनडे सीरिजनंतर रोहित खेळलेला नाही. आता मार्च महिन्यापासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये रोहित मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरेल, यासाठी पुढच्या काही दिवसात रोहित तयारीलाही सुरूवात करेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 'मुंबईत राहतो मराठी तर येणारच...', हास्यजत्रेच्या कलाकारांसमोर रोहित शर्माने मन जिंकलं, Video
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement