advertisement

Vaibhav Sooryavanshi : माझ्या नावाने स्कॅम... आधीच सावध व्हा! वैभव सूर्यवंशीने दिला इशारा!

Last Updated:

टीम इंडियाचा पुढचा सुपरस्टार वैभव सूर्यवंशी याने फक्त 14 व्या वर्षीच जगभरात ठसा उमटवला आहे. वैभवने नुकतंच अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऐतिहासिक शतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला.

माझ्या नावाने स्कॅम... आधीच सावध व्हा! वैभव सूर्यवंशीने दिला इशारा!
माझ्या नावाने स्कॅम... आधीच सावध व्हा! वैभव सूर्यवंशीने दिला इशारा!
मुंबई : टीम इंडियाचा पुढचा सुपरस्टार वैभव सूर्यवंशी याने फक्त 14 व्या वर्षीच जगभरात ठसा उमटवला आहे. वैभवने नुकतंच अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऐतिहासिक शतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला. वैभवच्या या सातत्यपूर्ण खेळींमुळे भारतीय क्रिकेटमधली त्याची लोकप्रियताही वाढत चालली आहे. सोशल मीडियाच्या या युगातील प्रत्येक लोकप्रिय सेलिब्रिटीप्रमाणेच आता वैभवच्या नावाने बनावट अकाउंट्स समोर आले आहेत, त्यामुळे वैभवनेने त्याच्या चाहत्यांना याबद्दल इशारा दिला आहे.
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये यशस्वी कामगिरी केल्यानंतर वैभव सूर्यवंशी आता आयपीएल 2026 च्या तयारीला लागला आहे. वैभवचं लक्ष क्रिकेटवर असताना, सोशल मीडियावर त्याच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. खरं तर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर वैभवच्या नावाने अनेक अकाउंट्स तयार करण्यात आली आहेत, ज्यामुळे वैभवचे खरे अकाऊंट कोणते आहे? वैभव स्वतःच त्याच्या नावाने पोस्ट करत आहे का? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
advertisement
अनेक सोशल मीडिया अकाउंट्स तयार करणे आणि त्यातून केल्या जाणाऱ्या पोस्टचा मुद्दा आता वैभव सूर्यवंशीपर्यंत पोहोचला आहे आणि त्याने स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे. 17 फेब्रुवारी रोजी वैभवने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये 'X' प्लॅटफॉर्मवर त्याचे अकाउंट नसल्याचे उघड झाले. वैभवने हिंदी आणि इंग्रजीमध्ये एक पोस्ट शेअर केली, 'एक छोटीशी माहिती: माझे X वर अकाउंट नाही. कृपया कोणत्याही बनावट अकाउंटपासून सावध रहा आणि त्यात सामील होण्याचे टाळा', असं आवाहन वैभवने केलं आहे.
advertisement

वैभव सूर्यवंशी फक्त इन्स्टाग्रामवर

वैभव सूर्यवंशी फक्त इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. या प्लॅटफॉर्मवर त्याचे एकूण 2.7 मिलियन फॉलोअर्स आहेत, जे त्याच्या वयाच्या इतर अनेक वरिष्ठ खेळाडूंपेक्षा जास्त आहे. X वर त्याच्या नावाने तयार केलेल्या सर्वात लोकप्रिय अकाउंटचेही 40 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. वैभव हा एकमेव खेळाडू नाही ज्याचे नाव यूजर्सना फसवण्यासाठी बनावट अकाउंट तयार करण्यासाठी वापरले गेले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील प्रसिद्ध खेळाडूंच्या नावाने एक्स आणि इंस्टाग्रामवर अशीच बनावट अकाऊंट अस्तित्वात आहेत आणि त्यांच्या पोस्ट अनेकदा खऱ्या समजल्या जातात.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Sooryavanshi : माझ्या नावाने स्कॅम... आधीच सावध व्हा! वैभव सूर्यवंशीने दिला इशारा!
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement