advertisement

IND vs PAK : अक्षरच्या एका शब्दाने बाबर उचकला... मैदानाबाहेरचा राग काढायला गेला अन् तोंडावर आपटला!

Last Updated:

भारताविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमवर अक्षर पटेलला खेळलेल्या शॉटवरून टीकेची झोड उठली आहे. अक्षर पटेलवरच्या रागामुळे बाबर आझमने असा शॉट खेळला का?

अक्षरच्या एका शब्दाने बाबर उचकला... मैदानाबाहेरचा राग काढायला गेला अन् तोंडावर आपटला!
अक्षरच्या एका शब्दाने बाबर उचकला... मैदानाबाहेरचा राग काढायला गेला अन् तोंडावर आपटला!
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर 61 रननी विजय मिळवून भारताने सुपर-8 मध्ये दणक्यात प्रवेश केला. इशान किशनची वादळी बॅटिंग आणि भारतीय बॉर्लची उत्कृष्ट कामगिरी यामुळे भारताने पाकिस्तानला कोलंबोच्या मैदानात लोळवलं. इशान किशनने 40 बॉलमध्ये 77 रन केले, ज्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. तर बॉलिंगमध्ये हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती यांना 2-2 विकेट मिळाल्या. कुलदीप यादव आणि तिलक वर्मा यांनी 1-1 विकेट घेतली.
भारताने दिलेल्या 176 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा 18 ओव्हरमध्ये फक्त 114 रनवर ऑलआऊट झाला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंवर त्यांच्या चाहत्यांकडून चौफेर टीका होत आहे. एवढच नाही तर बाबर आझम आणि शाहिन शाह आफ्रिदी यांना टीममधून बाहेर काढण्याची मागणीही केली जात आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यात बाबर फक्त 5 रन करून आऊट झाला. अक्षर पटेलच्या बॉलिंगवर बाबरने स्लॉग स्विप मारण्याचा प्रयत्न केला, पण या नादात तो बोल्ड झाला. बाबरने खेळलेल्या या शॉटवर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे, पण अक्षर पटेलने एका मुलाखतीमध्ये बाबर आझमची खिल्ली उडवली म्हणून त्याने असा शॉट मारला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by 2 Sloggers (@2sloggers)



advertisement
पहिल्या 4 ओव्हरमध्येच पाकिस्तानच्या 3 विकेट गेल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने अक्षर पटेलच्या हातात बॉल दिला, यानंतर पाचव्या ओव्हरचे पहिले चारही बॉल उस्मान खान खेळला आणि पाचव्या बॉलला बाबर स्ट्राईक वर आला. सामन्यामध्ये बाबर अक्षर पटेलचा पहिलाच बॉल खेळत होता, पण तरीही तो मोठा शॉट मारायला गेला आणि आऊट झाला.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by 2 Sloggers (@2sloggers)



advertisement

अक्षरने उडवली बाबरची खिल्ली

एका मुलाखतीमध्ये अक्षर पटेलने बाबर आझमच्या इंग्रजीची खिल्ली उडवली होती. केव्हिन पीटरसनला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाबर आझमने गुझबम्प (अंगावर शहारे येणे) ऐवजी बूजबम्प असा शब्द वापरला, यावरून सोशल मीडियावर बाबरला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं. अक्षर पटेलनेही एका मुलाखतीमध्ये बूजबम्प हा शब्द वापरून बाबर आझमची खिल्ली उडवली, ज्याचं मीम सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं.
advertisement
अक्षर पटेलने उडवलेल्या या खिल्लीचा बाबर आझमला राग आला आणि त्याने अक्षर पटेलला पहिल्याच बॉलला धडा शिकवण्यासाठी असा शॉट मारला का? अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. बाबरने खरंच अक्षर पटेलला प्रत्युत्तर देण्यासाठी असा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला असेल, तर मात्र यामध्ये त्याचंच जगासमोर हसं झालं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : अक्षरच्या एका शब्दाने बाबर उचकला... मैदानाबाहेरचा राग काढायला गेला अन् तोंडावर आपटला!
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement