बड्या कंपन्यांनी रात्रीतून बदलले गेम प्लॅन्स; मार्केटमध्ये उद्या 'ॲक्शन' पॅक ट्रेडिंग सत्र, 11 Share यादी फुटली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market Prediction: मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्याने बुधवारी संबंधित शेअर्समध्ये हालचाल दिसण्याची शक्यता आहे. AI भागीदारी, मोठे प्रकल्प, मर्जर आणि व्यवस्थापन बदल यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष या स्टॉक्सकडे लागले आहे.
बुधवारीच्या सत्रात अनेक शेअर्समध्ये हालचाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर विविध कंपन्यांकडून महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून, त्याचा परिणाम आता बाजारात दिसू शकतो. या कंपन्यांमध्ये Infosys, Eternal, Bharti Airtel, REC, PFC, Hexaware Tech, Dabur, Dilip Buildcon, Engineers India, GR Infraprojects, GPT Infraprojects आणि Bosch यांचा समावेश आहे.
advertisement
Infosys: इन्फोसिसने ‘AI First Value Framework’ लाँच केल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या उपक्रमाचा उद्देश सुमारे 300 अब्ज डॉलर्सच्या नव्या AI सेवा संधींचा लाभ घेणे हा आहे. या फ्रेमवर्कद्वारे संस्थांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्राधान्य देत व्यवसायमूल्य निर्माण करता येईल, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला गती देता येईल आणि AI-आधारित सेवा प्रभावीपणे स्वीकारता येतील.
advertisement
advertisement
Bharti Airtel: भारती एअरटेलने कळवले आहे की तिच्या उपकंपनी Airtel Money ला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून Type II Non-Deposit Accepting NBFC म्हणून कार्य करण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र (Certificate of Registration) मिळाले आहे. RBI च्या अटींनुसार, ही संस्था सार्वजनिक ठेवी स्वीकारणार नाही. मात्र NBFC व्यवसाय सुरू करण्यास तिला मंजुरी देण्यात आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
GR Infraprojects: GR Infraprojects ला 17 फेब्रुवारी 2026 रोजी West Central Railway कडून मध्य प्रदेशातील नवीन रेल्वे मार्ग बांधण्यासाठी Letter of Acceptance (LoA) मिळाला आहे. EPC कराराअंतर्गत बहारी आणि गोंडावली स्थानकांदरम्यान नवीन रेल्वे लाईन उभारली जाणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 1,897.51 कोटी असून नियुक्तीच्या तारखेपासून 900 दिवसांत तो पूर्ण करायचा आहे.
advertisement
GPT Infraprojects: 17 फेब्रुवारी रोजी GPT Infraprojects Ltd ने जाहीर केले की उत्तर रेल्वेकडून 1,201.36 कोटींचा कंत्राट मिळाला आहे. हा प्रकल्प वाराणसीतील गंगा नदीवर रेल्वे-कम-रोड ब्रिज बांधण्यासंदर्भात आहे. हा प्रकल्प RVNL सोबत संयुक्त उपक्रमात (Joint Venture) राबवला जाणार असून, या JV मध्ये GPT Infra ची 40% हिस्सेदारी आहे.
advertisement
Bosch: Bosch कंपनीने माहिती दिली की Karin Gilges यांनी CFO पदाचा राजीनामा दिला असून तो 31 मे 2026 पासून प्रभावी होईल. त्यानंतर 1 जून 2026 पासून Tillmann Olsen हे कंपनीचे नवे CFO म्हणून कार्यभार स्वीकारतील. (Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.)









