advertisement

Guess Who : सायकल चालवणारा हा मुलगा, पैशांसाठी कधी बनला वेटर, विकले दागिने; आज बॉलिवूडचा महागडा अभिनेता

Last Updated:

Guess Who Actor :फोटोमध्ये दिसणाऱ्या या मुलाला ओळखलं का? हा अभिनेता आता बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता आहे. तुम्ही ओळखलं का याला.

News18
News18
बॉलीवूड स्टार्सचे बालपणीचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. आज आम्ही तुम्हाला एका प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो पाहताय त्याला ओळखणंही कठीण आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो एका अशा अभिनेत्याचा आहे जो आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. जर तुम्ही या मुलाला ओळखत नसाल ज्याला बॉलिवूडमध्ये हिट मशीन मानला जातो.
जर तुम्ही त्याला अजूनही ओळखत नसाल, तर मी तुम्हाला आणखी एक हिंट, तो हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार आहे आणि एका अतिशय सुंदर अनुभवी अभिनेत्रीचा जावई आहे. सोशल मीडियावर त्याचे खूप मोठे चाहते आहेत. आज तो बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे.
advertisement
सायकल चालवणाऱ्या या मुलाला पहिल्यापासूनच फिटनेसची आवड आहे. त्याच्या फिटनेसची तो विशेष काळजी घेतो. हा फोटो शेअर करताना, अभिनेत्याने लहानपणापासूनच खेळात रस असल्याचेही सांगितलं. अभ्यासापेक्षा त्याला खेळ आवडायचा. त्याची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्याला दोन मुलं आहेत.
advertisement
सायकल चालवणारा हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अक्षय कुमार आहे. अक्षयच्या दिल्लीतील पालकांनी त्याचे नाव हरिओम भाटिया ठेवले. लष्करी कुटुंबातील असल्याने, हरिओम भाटियाचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. त्याला अभ्यासापेक्षा खेळात जास्त रस होता. तो सुरुवातीपासूनच फिटनेस फ्रिक होता.
अक्षय कुमार 55 वर्षांचा आहे परंतु त्याचा फिटनेस तरुणांना चॅलेंज देतो. अक्षय कुमारने या क्षेत्रात येण्यापूर्वी खूप संघर्ष केला. त्याने कॉलेज सोडले आणि मार्शल आर्ट्स शिकण्यास सुरुवात केली. ब्लॅक बेल्टधारक अक्षय तायक्वांदो शिकण्यासाठी थायलंडला गेला. स्वतःचा खर्च करण्यासाठी तो एका हॉटेलमध्ये वेटर आणि शेफ म्हणून काम करत होता. तो कोलकाता येथील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करत होता. तो दिल्लीत कुंदनचे दागिने विकण्याचे कामही करत होता. त्यानंतर त्याला मॉडेलिंगमध्ये काम मिळाले आणि हळूहळू तो चित्रपटसृष्टीचा भाग बनला. आज त्याचे यश निर्विवाद आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Guess Who : सायकल चालवणारा हा मुलगा, पैशांसाठी कधी बनला वेटर, विकले दागिने; आज बॉलिवूडचा महागडा अभिनेता
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement