advertisement

त्या सिनेमामुळे अवधूत गुप्तेवर आलेली मुंबई सोडण्याची वेळ, बाळासाहेबांच्या एका फोनने सगळं बदललं

Last Updated:
गायक अवधूत गुप्तेनं काही सिनेमेही दिग्दर्शित केलेत. पण एका सिनेमामुळे अवधूतवर मुंबई सोडून जाण्याची वेळ आली होती.
1/8
मराठी इंडस्ट्रीतील सध्याचा आघाडीचा गायक आणि संगीतकार म्हणजे अवधूत गुप्ते. उत्तम गायक, संगीतकार, गीतकार इतकंच नाही तर दिग्दर्शक, निर्माता आणि निवेदक अशी अवधूतही ओळख आहे. संगीत क्षेत्रात काम करत असताना अवधूतनं त्याचे सिनेमे देखील काढले.

2/8
मोरया, झेंडे सारखे त्याचे सिनेमे तूफान गाजले. आजही हे सिनेमे तितक्याच आवडीनं पाहिले जातात. सिनेमा क्षेत्रात अवधूत तितका रमला नाही. पण त्याने जे सिनेमे केले त्याला प्रेक्षकांनीही पुरेपूर न्याय दिला. पण एका सिनेमामुळे अवधूत गुप्तेवर मुंबई सोडण्याची वेळ आली होती. तो मुंबईसोडून गेला होता. नेमकं काय झालं होतं? कोणता होता तो सिनेमा? 

3/8
अवधूत गुप्तेनं आतापर्यंत झेंडा, मोरया, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, एकतारा, कान्हा, गॅटमॅट सारखे सिनेमे बनवले. त्याचा 'झेंडा' हा सिनेमा महाराष्ट्राच्या राजकीय विश्वाला हादरवून सोडणाऱ्या एका सत्यघटनेवर आधारित होता. अवधूतचा हा पहिलाच सिनेमा आणि खूप मोठं धाडसं त्याने केलं होतं. 

4/8
हा सिनेमा आला तेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते त्यामुळे ठाकरे कुटुंबात निर्माण झालेली दरी, घराणेशाहीचे आरोप आणि अनेक शिवसैनिकांनी नव्या राजकीय वाटा निवडणं या घडामोडींनी राज्याचं वातावरण ढवळून निघालं होतं. या वास्तवाला काल्पनिक रंग देत 'झेंडा' हा सिनेमा आला होता. 

5/8
सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना आवडला पण काहींनी त्याला तीव्र विरोध दर्शवला. मराठी अस्मितेवर भाष्य केल्यामुळे अनेक कडव्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतले. सिनेमानं तेव्हा रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 'विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती' हे सिनेमातील गाणी आजही तितकंच लोकप्रिय आहे. 

6/8
एकीकडे सिनेमाला यश मिळत होतं मात्र दुसरीकडे अनेक लोक अवधूत गुप्तेच्या मुंबईतील घराबाहेर निदर्शनं करत होती. त्याच्यावर जोरदार टीका सुरू होती. त्याचं संपूर्ण कुटुंब यातून जात होतं. त्यामुळे त्याने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो गोव्यात शिफ्ट झाला.  त्याच दरम्यान एका मासिकात सिनेमावर टीकात्मक लेख आला ज्यात शिवसेनेने अवधूतला पुरेसा पाठिंबा दिला नाही असं लिहिलं होतं. 

7/8
हा लेख वाचल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः अवधूत गुप्तेला फोन केला.
हा लेख वाचल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः अवधूत गुप्तेला फोन केला. "शिवसेना तुझ्या पाठीशी उभी राहिली नाही असं तुला वाटतं का?" असा थेट सवाल त्यांनी केला. अवधूत यांनी नकार दिल्यावर बाळासाहेबांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, काही नुकसान झालं असेल तर ते स्वतः त्यांच्या पाठीशी उभे राहतील.
advertisement
8/8
बाळासाहेबांचा हा फोन अवधूत गुप्तेंसाठी मोठा दिलासा ठरला. एका फोन कॉलने त्यांच्यावरचं दडपण कमी झालं आणि अवधूत गुप्ते कुटुंबासह पुन्हा मुंबईत आला.  

दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement