PMP प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; गुरुवारी अनेक बसमार्गांत बदल, घराबाहेर पडण्याआधी करा चेक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे शहरात उद्या (गुरुवारी) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
पुणे: पुणे शहरात उद्या (गुरुवारी) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. भवानी माता मंदिर येथून निघणारी ही मिरवणूक सिव्हिल कोर्टातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समाप्त होईल. या सोहळ्यामुळे मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. आता पीएमपी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या अनेक मार्गावरील बस संचलनात बदल करण्यात आले आहेत.
मार्गांमधील मुख्य बदल खालीलप्रमाणे:
जंगली महाराज रस्ता ते स्वारगेट चौक: २, १०, ११, १७, २१, ३७, ३८, २१६ यांसह अनेक मार्गावरील बसेस आता बालगंधर्व, डेक्कन आणि अलका टॉकीज चौकातून कुमठेकर रोड, विश्रामबाग वाडा व मंडईमार्गे स्वारगेटला जातील.
मनपा भवन ते शिवाजी पुतळा रस्ता बंद: रस्ता बंद असल्यामुळे ३५, ३६, ८२, ९९, ११५, १५२ यांसारख्या मार्गावरील बसेस ढोले पाटील रोड आणि फर्ग्युसन रोडवरून धावतील. तसेच लक्ष्मी रोड बंद झाल्यावर काही बसेस पुणे स्टेशन, गोळीबार मैदान व स्वारगेट मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
advertisement
फडके हौद ते दारूवाला पूल: ९, ५७, ८१, ९४, १०८, १७४ या मार्गावरील बसेस कुंभारवाडा, जुना बाजार आणि मंगळवार पेठ मार्गे पुणे स्टेशनकडे जातील. परतीच्या प्रवासासाठीही याच पर्यायी मार्गांचा वापर केला जाईल.
प्रवाशांना आवाहन:
मिरवणुकीमुळे निर्माण होणारी गर्दी आणि रस्ते बदल लक्षात घेऊन प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आणि पर्यायी मार्गांची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 10:14 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
PMP प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; गुरुवारी अनेक बसमार्गांत बदल, घराबाहेर पडण्याआधी करा चेक










