advertisement

Baby Girl and Boy Names: राधा आणि श्रीकृष्‍णावरून मुला-मुलींची खास नावे; अर्थासहित ही लिस्ट पाहून घ्या

Last Updated:

Baby Girl and Boy Names: नाव ठेवण्यासाठी सगळ्यांनाच चांगली अर्थपूर्ण नावे हवी असतात. राधाकृष्णाच्या नावांवरून लहान मुलांच्या नावांची ही यादी पाहूया. यातील एखादे नाव तुम्हाला पसंत पडू शकते.

News18
News18
मुंबई : राधाकृष्णाच्या पूजेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. त्यांच्या कृपेने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात. भक्तीभावने पूजा करणाऱ्यांवर श्रीकृष्ण आशीर्वादाचा वर्षाव करतात. कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा त्याच्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम होतो. म्हणूनच, जर तुमच्या घरी मुलगा किंवा मुलगी जन्माला आली आणि तुम्ही त्यांचे नाव राधाकृष्णाच्या नावावरून ठेवले, तर त्यांच्या आयुष्यावर देवाचा आशीर्वाद कायम राहील. राधाकृष्णाच्या नावांवरून लहान मुलांच्या नावांची ही यादी पाहूया. यातील एखादे नाव तुम्हाला पसंत पडू शकते.
श्रीकृष्णाच्या नावावरून मुलांची नावे
अच्युत : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - कधीही चूक न करणारा किंवा ढळणार नाही असा प्रभू.
अद्भुतह : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - आश्चर्यकारक प्रभू.
अनंतजीत : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - नेहमी विजयी होणारा.
दानवेंद्रो : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - वरदान देणारा.
advertisement
ज्ञानेश्वर : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - ज्ञानाचा देव.
जयंतह : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - सर्व शत्रूंना पराभूत करणारा.
कंजलोचन : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - ज्याचे डोळे कमळासारखे आहेत.
केशव : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - सुंदर लांब केस असलेला.
माधव : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - ज्ञानाचा साठा.
advertisement
मधुसूदन : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - मधू नावाच्या राक्षसाचा वध करणारा.
पार्थसारथी : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - अर्जुनाचा सारथी.
सहस्राकाश : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - हजार डोळे असलेला प्रभू.
शंतह : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - शांत स्वभावाचा.
सुमेध : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - सर्वज्ञानी.
advertisement
वृषपर्व : श्रीकृष्णाच्या या नावाचा अर्थ आहे - धर्माचा देव.
राधेच्या नावावरून मुलींची नावे -
राधा : या शब्दाचा अर्थ आहे यश किंवा समृद्धी.
सर्वाद्या : याचा अर्थ आहे सर्वांची आराध्या.
advertisement
सर्ववंद्या : याचा अर्थ आहे सर्वांकडून वंदन केली जाणारी.
वृंदाराधा : याचा अर्थ आहे वृंदावनची राधा.
सत्यभामा : याचा अर्थ आहे सत्याची शोभा.
गान्धर्वा : याचा अर्थ आहे गंधर्वांची देवी.
पूर्णा : याचा अर्थ आहे पूर्णता.
भुक्ति-मुक्तिप्रदा : याचा अर्थ आहे भक्ती आणि मोक्ष देणारी.
भवव्याधि-विनाशिनी : याचा अर्थ आहे जगातील दुःख आणि रोग दूर करणारी.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Baby Girl and Boy Names: राधा आणि श्रीकृष्‍णावरून मुला-मुलींची खास नावे; अर्थासहित ही लिस्ट पाहून घ्या
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement